मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /फ्लाईटमधील मस्ती भोवणार! महिलेवर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीवर होणार मोठी कारवाई

फ्लाईटमधील मस्ती भोवणार! महिलेवर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीवर होणार मोठी कारवाई

न्यूयॉर्क ते नवी दिल्ली फ्लाइटमध्ये एका महिला प्रवाशावर लघवी करणारी व्यक्ती ही मुंबईतली बिझनेसमन आहे.

न्यूयॉर्क ते नवी दिल्ली फ्लाइटमध्ये एका महिला प्रवाशावर लघवी करणारी व्यक्ती ही मुंबईतली बिझनेसमन आहे.

न्यूयॉर्क ते नवी दिल्ली फ्लाइटमध्ये एका महिला प्रवाशावर लघवी करणारी व्यक्ती ही मुंबईतली बिझनेसमन आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 5 जानेवारी :  एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये 26 नोव्हेंबर 2022 रोजी एक धक्कादायक प्रकार घडला होता. एका पुरुष प्रवाशाने एका महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यामुळे दिल्ली पोलीस या प्रवाशाचा शोध घेत आहेत. न्यूयॉर्क ते नवी दिल्ली फ्लाइटमध्ये मद्यधुंद अवस्थेत एका महिला प्रवाशावर लघवी करणारी व्यक्ती ही मुंबईतली बिझनेसमन आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक केली जाईल, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. "हा आरोपी मुंबईचा रहिवासी आहे; पण सध्या तो इतर राज्यात आहे. पोलिसांचं पथक तिथे पोहोचलं आहे," अशी माहिती दिल्ली पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    एएनआयने दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी प्रवासी मुंबईतल्या मीरा रोड भागातला रहिवासी आहे. तो सध्या मुंबईत नाही. घटनेच्या वेळी फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या सर्व केबिन क्रू मेंबर्सना दिल्ली पोलीस नोटीस देऊ शकतात आणि त्यांना स्टेटमेंटसाठी बोलावू शकतात. याशिवाय, पोलिसांनी पीडित महिलेच्या आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांचीही माहिती मागवली आहे.

    पीडितेने एअर इंडियाकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी बुधवारी (4 जानेवारी) गुन्हेगाराविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथकं तयार केली गेली आहेत. राष्ट्रीय महिला आयोगानं या घटनेची दखल घेऊन एअर इंडियाला पत्र लिहिलं आहे.

    10 वाहनं करत होती आरोपींच्या कारचा पाठलाग; पण.., अंजली मृत्यू प्रकरणात नवा दावा

    काय घडले प्रकरण?

    26 नोव्हेंबर रोजी बिझनेस क्लासमधल्या एका प्रवाशाने महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याची धक्कादायक घटना घडली होती. लघवी केल्यानंतर, इतर प्रवाशांनी त्याला विरोध करेपर्यंत तो आपला प्रायव्हेट पार्ट दाखवत उभा होता. क्रू मेंबर्सनी पीडित महिला प्रवाशाला नवीन कपड्यांचा सेट देऊन क्रू सीटवर बसवण्यास जागा दिली होती.

    विमान भारतात उतरल्यानंतर कोणतीही तत्काळ कारवाई करण्यात आली नाही. महिला प्रवाशाच्या लेखी तक्रारीनंतरच, एअरलाइनने अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली. या समितीनं आरोपी प्रवाशाला 30 दिवसांसाठी उड्डाण करण्यास बंदी घातली आहे. हे प्रकरण पुढच्या कारवाईसाठी डीजीसीएकडे पाठवण्यात आलं आहे.

    एअर इंडियाच्या सूत्रांनी बुधवारी (4 जानेवारी) असा दावा केला की, पीडित प्रवाशाला तक्रार नोंदवायची नव्हती. आरोपी प्रवाशाने माफी मागितल्यानंतर आणि आर्थिक भरपाई दिल्याने फ्लाइटमध्येच प्रकरण मिटलं, अशी बातमी पीटीआयने दिली आहे. एअर इंडियाने असाही दावा केला आहे, की फ्लाइटमधल्या क्रूने आपल्या कर्तव्यात कोणतीही हलगर्जी केलेली नाही.  . त्यांनी पीडित प्रवाशाला साथ दिली आणि तिला क्रूसाठी राखीव असलेल्या पर्यायी बिझनेस क्लास सीटवर बसवलं.

    First published:
    top videos

      Tags: Air india, Crime news, Shocking news