मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Air India च्या विमानात घडला धक्कादायक प्रकार; मद्यधुंद व्यक्तीनं महिलेच्या अंगावर केली लघुशंका, अन्...

Air India च्या विमानात घडला धक्कादायक प्रकार; मद्यधुंद व्यक्तीनं महिलेच्या अंगावर केली लघुशंका, अन्...

फाईल फोटो

फाईल फोटो

विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये नशेत असलेल्या पुरुष प्रवाशानं एका महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केली. हे विमान न्यूयॉर्कच्या जॉन एफ. केनेडी विमानतळावरून दिल्लीला निघालं होतं.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Delhi, India

  नवी दिल्ली 04 जानेवारी : न्यूयॉर्कहून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानात एक धक्कादायक घटना घडली आहे. या विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये नशेत असलेल्या पुरुष प्रवाशानं एका महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केली. 26 नोव्हेंबर 2022 रोजी एअर इंडियाच्या फ्लाइट AI-102 मध्ये ही घटना घडली. हे विमान न्यूयॉर्कच्या जॉन एफ. केनेडी विमानतळावरून दिल्लीला निघालं होतं.

  घटना घडताच पीडित महिलेनं तातडीनं विमानातील केबिन क्रू मेंबर्सना याची माहिती दिली होती. पण त्यानंतरही संबंधित व्यक्तीवर कारवाई झाली नाही. उलट विमान दिल्लीत उतरल्यानंतर संबंधित पुरुष प्रवाश्याला सोडून देण्यात आलं. अखेर पीडित महिलेनं याबाबत टाटा समूहाचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना पत्र लिहून घटनेची माहिती दिलीय. त्यानंतर ‘एअर इंडिया’नं या प्रकरणाची चौकशी सुरू केलीय.

  Pune Crime News : तिने दारू मागितली अन् पोरांनी तिला विवस्त्र करून संपवलं, पुण्यात घडलं भयानक कांड

  पीडित महिलेनं चंद्रशेखरन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, ‘संबंधित विमानातील क्रू मेंबर्स हे अतिशय संवेदनशील आणि कठीण परिस्थितीला योग्यरित्या हाताळण्यासाठी सक्षम नव्हते. विमानात प्रवास करतानाची माझी सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी विमान कंपनीकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, याचे मला दुःख झाले आहे.’ पीडित महिलेनं पुढे पत्रात लिहिलं आहे की, 'दुपारच्या जेवणानंतर लाईट बंद करण्यात आले. यानंतर काही वेळातच एक मद्यधुंद प्रवासी माझ्या सीटजवळ आला आणि त्यानं माझ्या अंगावर लघवी केली. लघवी केल्यानंतर तो प्रवासी माझ्या सीटजवळ उभा राहिला. शेजारी बसलेल्या एका प्रवाशानं त्याला निघायला सांगितल्यावर तो निघून गेला.’

  '2 वर्ष शारीरिक संबंधाचा आनंद मिळाला नाही'; तुरुंगातून बाहेर येताच व्यक्तीने सरकारकडे मागितली 10 हजार कोटींची भरपाई

  पीडित महिला प्रवाशानं पुढे म्हटलं आहे की, ‘या घटनेत माझे कपडे, बॅग, शूज इत्यादी भिजले. मी याबाबत विमानातील कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली, तेव्हा एक एअर होस्टेस आली, आणि केवळ जंतुनाशक फवारणी करून निघून गेली. केबिन क्रू मेंबर्सनी नंतर मला पायजमा आणि डिस्पोजेबल चप्पल दिली, जेणेकरून मला त्याचा वापर करता येईल. मला माझ्या सीटवर बसण्याची इच्छा नव्हती. त्यानंतर मला दुसरं सीट देण्यात आलं. त्या दुसऱ्या सीटवर मी जवळपास एक तास बसले. मी जेव्हा माझ्या आधीच्या सीटवर बसण्यासाठी गेले, तेव्हा तिथे लघवीचा उग्र वास येत होता.’

  दरम्यान, पीडित महिलेनं टाटा समूहाच्या अध्यक्षांना पत्र लिहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची गंभीर दखल एअर इंडियानं घेतली असून, चौकशी सुरू केली आहे. आता या चौकशीमधून नेमकं काय समोर येतं, हे लवकरच स्पष्ट होईल.

  First published:
  top videos

   Tags: Air india, Shocking news