पटना, 8 सप्टेंबर : घराबाहेरून चाललेल्या मुलीने (girl) चोरी करताना (theft) पाहिलं म्हणून एका मद्यपी आरोपीने (Drunken man) मुलीचा खून (Murder) करून तिला स्वतःच्याच घरात गाडल्याची (Buried) घटना समोर आली आहे. आपण चोरी करत असल्याचं इतर कुणाला कळू नये, यासाठी त्यानं मुलीला घरात बोलावलं, तिची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह स्वतःच्याच घरात पुरून टाकला. असा केला खून बिहारमधील सुपौल भागात राहणारा मोहम्मद राशिद दारुच्या नशेत स्वतःच्याच घरात चोरी करत होता. त्यावेळी गल्लीतून चाललेल्या आणि शेजारी राहणाऱ्या 6 वर्षांच्या सानियाने ही गोष्ट पाहिली. त्यामुळे संतापलेल्या मोहम्मदने सानियाला घरात ओढून घेतले आणि तिचा गळा दाबून निर्दयीपणे खून केला. निष्पाण सानियाला काही समजायच्या आतच तिचा जीव गेला. आपला दोष काय, हेदेखील कळण्याच्या आत नराधम मोहम्मदने तिचे प्राण घेतले. त्यानंतर आपला गुन्हा लपवण्यासाठी त्याने स्वतःच्याच घरात सानियाचा मृतदेह पुरून टाकला. असा लागला शोध रात्र होऊनदेखील मुलगी घरी न आल्यामुळे सानियाच्या आईवडिलांनी शोधाशोध सुरू केली. पोलिसांत सानिया गायब झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनीही तिचा शोध घ्यायला सुरुवात केली. शोध घेत असताना जेव्हा पोलीस आणि सानियाचे वडील मोहम्मद हसन हे मोहम्मद राशिदच्या घरी आले, तेव्हा त्याच्या घरातील जमीन उकरल्याचं त्यांना दिसलं. संशय आल्यामुळे त्या ठिकाणी खोदकाम केल्यानंतर सानियाचा मृतदेह पोलिसांना सापडला. हे वाचा - शिवसेना नेत्याच्या बंगल्यात बिबट्याचा वावर; घुसखोरी करत कुत्र्याला केलं भक्ष्य पोलिसांनी मोहम्मद राशिदला अटक केल्यानंतर त्याने खुनाची कबुली देत खरं कारण सांगितलं. एक चोरी लपवण्यासाठी अवघ्या 6 वर्षांच्या मुलीची हत्या केल्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. मोहम्मद राशिदला फाशीची शिक्षा देण्याच मागणी सानियाच्या कुटुंबीयांनी केली आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.