प्रेयसीने खेळला प्रेमाचा डबल गेम, प्रियकाराने रंगे हात पकल्यावर केलं धक्कादायक कृत्य

प्रेयसीने खेळला प्रेमाचा डबल गेम, प्रियकाराने रंगे हात पकल्यावर केलं धक्कादायक कृत्य

आपल्याला धोका दिल्याच्या नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

पणजी, 25 एप्रिल : लॉकडाऊन दरम्यान एका 22 वर्षीय मुलाने आपल्या गर्लफ्रेंडची हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना शुक्रवारी दक्षिण गोव्यातील बेनौलीम गावची असल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी तरुणाची प्रेयसी फोनवर कुणाशीतरी बोलत होती, जे त्याने ऐकलं होतं. त्यामुळे आपल्याला धोका दिल्याच्या नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे घरात वाहिला रक्ताचा पाट; चाकू, स्क्रूडायव्हरने जोडप्याला संपवलं

पोलिसांनी सांगितले की आरोपींनी मृत मुलीला बिनौलियममधील निर्जन ठिकाणी बोलावले होते, जिथे त्याने तिची हत्या केली. मुलीचा मृतदेह मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला. या मुलीच्या हत्येमध्ये आरोपी मेलबर्नचा हात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. एसपी अरविंद गावस म्हणाले की, घटनेच्या काही तासांतच आरोपीला शोधण्यात आलं आणि त्याला कोळवा पोलिसांनीही अटक केली. परंतु, या गुन्ह्यामागील खरं कारण पुढं आलं नाही.

त्याचवेळी दुसर्‍या अधिकाऱ्याने सांगितले की, ही मुलगी मार्गगाव गावात एका दुसऱ्या तरुणाशी बोलतानाही दिसली होती, त्यानंतर आरोपी संतापला आणि त्याने रागात टोकाचं पाऊल उचललं. आरोपीविरोधात खुनासाठी आयपीसी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केरळसह या 8 राज्यांनी जिंकली कोरोनाची लढाई, 50 टक्क्यांहून अधिक रुग्ण झाले बरे

First published: April 25, 2020, 2:38 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या