वॉशिंग्टन 12 एप्रिल : अमेरिकेत भिकाऱ्याने महिलेची हत्या (Murder News) केल्याची घटना अनेक महिने चर्चेत राहिली. या घटनेनंतर भिकाऱ्यांबद्दल लोकांचे विचारही बदलले. चॅट-शो क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओप्रा विन्फ्रेने म्हटलं की, आता ती भिकाऱ्यांना काहीही देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल. मात्र, सत्य बाहेर आल्यावर सर्वांचेच डोळे पाणावले. ‘मिरर’च्या रिपोर्टनुसार, ज्या खूनासाठी रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भिकाऱ्याला दोषी ठरवलं जात होतं, त्या प्रकरणात हत्या झालेल्या महिलेचा पतीच गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे (Man Killed Wife). बाल्टिमोरमध्ये राहणार्या जॅकलीनने 2018 मध्ये किथ स्मिथ नावाच्या व्यक्तीसोबत दुसरं लग्न केलं होतं. स्मिथला त्याच्या पहिल्या बायकोपासून एक मुलगी होती आणि ती त्याच्यासोबतच राहत होती. 52 वर्षीय जॅकलीन तिच्या नवीन लग्नामुळे खूप आनंदी होती, परंतु तिचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. Crime Patrol पाहून रचला महिलेच्या हत्येचा कट, कोल्ड ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या आणि मग… गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, कीथ स्मिथने 911 वर कॉल केला आणि सांगितलं की एका भिकाऱ्याने त्याच्या पत्नीला भोसकलं आहे आणि तिला रुग्णालयात नेत आहे. डॉक्टरांनी जॅकलीनला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. जॅकलिनच्या छातीवर चाकूने पाच वार करण्यात आले होते. जास्त रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर स्मिथ आणि त्याच्या मुलीने पोलिसांना सांगितलेली गोष्ट ऐकून लोकांच्या मनात भिकाऱ्यांबद्दल द्वेष निर्माण झाला. कीथ स्मिथने सांगितलं की ते सर्वजण वाढदिवसाच्या पार्टीतून परतत होते. तेव्हा वाटेत त्याला रस्त्याच्या कडेला एक महिला दिसली, जिच्या हातात एक लहान बाळ होतं. जॅकलिनला त्या महिलेला काही पैसे द्यायचे होते. त्यामुळे तिने महिलेजवळ गाडी थांबवण्यास सांगितलं. मागच्या सीटवर बसलेल्या जॅकलीनने कारची काच खाली करताच भिकारी महिलेने तिच्यावर हल्ला केला. दरम्यान, महिलेचा साथीदारही तिथे पोहोचला आणि भांडणात त्याने जॅकलीनचा चाकूने वार करून खून केला. स्मिथ आणि त्याच्या मुलीच्या या कथेवर पोलिसांचा थोडाफार विश्वास बसला, पण सुनसान रस्त्यावर एका अनोळखी महिलेसाठी गाडी थांबवली गेली, हे पोलिसांना खरं वाटलं नाही. त्यामुळे जेव्हा अधिकाऱ्यांनी स्मिथच्या वक्तव्याची चौकशी सुरू केली, तेव्हा एक-एक खोटं उघड झालं. पोलिसांनी घटनास्थळी बसवलेले सीसीटीव्ही तपासले असता, नमूद केलेल्या वेळी स्मिथची कार तिथे नव्हतीच, असं आढळून आलं. त्याचं मोबाईल लोकेशनही त्याच्या खोटेपणाची कहाणी सांगत होतं. Mass Suicide: दोन नातवंडांना घेऊन आजीने घेतली विहिरीत उडी, सामूहिक आत्महत्येने गावात एकच खळबळ यानंतर पोलिसांनी स्मिथच्या मुलीची कसून चौकशी केली, त्यानंतर तिने संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला. मुलीने सांगितलं की तिच्या वडिलांनी जॅकलिनची हत्या केली होती, कारण तिने त्याला घटस्फोट देण्याचं ठरवलं होतं. जॅकलिन आर्मी रिसर्च फॅसिलिटीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर होती आणि स्मिथ ड्रायव्हर म्हणून काम करत होता. स्मिथला वाटू लागलं की जॅकलीनने त्याला सोडलं तर त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. त्यामुळेच त्याने जॅकलिनला रस्त्यातून हटवण्याचा प्लॅन केला. स्मिथची मुलगी व्हॅलेरियाने पोलिसांना सांगितलं की, पार्टीवरून परतत असताना वडिलांनीच जॅकलिनवर चाकूने हल्ला केला. यानंतर त्याने 911 वर कॉल करून एका भिकाऱ्याची गोष्ट सांगितली. स्मिथचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. यासोबतच त्याने एकदा आपल्या भावालाही जॅकलिनला मारण्यास सांगितलं होतं. मारेकरी पती आणि त्याची मुलगी देश सोडून जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.