मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /शेजाऱ्याच्या पत्नीला 'टोमॅटो' म्हणणं पडलं महागात; भडकलेल्या पतीने 56 वर्षीय व्यक्तीला दिला भयंकर मृत्यू

शेजाऱ्याच्या पत्नीला 'टोमॅटो' म्हणणं पडलं महागात; भडकलेल्या पतीने 56 वर्षीय व्यक्तीला दिला भयंकर मृत्यू

Bihar crime: महेश आपल्यालाच टोमॅटो म्हणत असल्याचा आरोपीच्या पत्नीचा समज झाला. तिनं घरी जाऊन महेश दासनं आपल्याला टोमॅटो म्हणत आपला विनयभंग केल्याची माहिती कुटुंबीयांना दिली

Bihar crime: महेश आपल्यालाच टोमॅटो म्हणत असल्याचा आरोपीच्या पत्नीचा समज झाला. तिनं घरी जाऊन महेश दासनं आपल्याला टोमॅटो म्हणत आपला विनयभंग केल्याची माहिती कुटुंबीयांना दिली

Bihar crime: महेश आपल्यालाच टोमॅटो म्हणत असल्याचा आरोपीच्या पत्नीचा समज झाला. तिनं घरी जाऊन महेश दासनं आपल्याला टोमॅटो म्हणत आपला विनयभंग केल्याची माहिती कुटुंबीयांना दिली

  नवी दिल्ली 31 मार्च : 'राग हा माणसाचा शत्रू आहे', अशी शिकवण तुम्हाला शाळेत असताना मिळालेली असेल. रागात (Anger) असलेली व्यक्ती कुठल्याही गोष्टीवर सारासार विचार करू शकत नाही. त्यामुळे रागाच्या भरात तिच्याकडून चुकीचे निर्णय (Wrong Decision) घेतले जाण्याची शक्यता सर्वात जास्त असते. काहीवेळा तर रागाच्या भरात त्या व्यक्तीच्या हातून एखादा गुन्हादेखील घडून जातो. बिहारमधील (Bihar) ब्रह्मदेव दास नावाच्या व्यक्तीच्याबाबतही असंच घडलं आहे. या व्यक्तीनं आपल्या 56 वर्षीय शेजाऱ्याची हत्या (Neighbor Murder) केली आहे.

  ब्रह्मदेव दासची पत्नी बाजारातून परतत असताना महेश दास नावाच्या व्यक्तीनं तिचा विनयभंग केल्याचं तिनं पतीला सांगितलं. यामुळे तिच्या पतीनं इतर सहा जणांसह मध्यमवयीन महेशला बेदम मारहाण केली. त्यात महेशचा मृत्यू (Death) झाला. बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील जगतपूर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  टेटियाबंबर ब्लॉकमधील आरजेडीचे अध्यक्ष भूदेव प्रसाद दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महेश दास मंगळवारी संध्याकाळी तिलकारी भाजी बाजारातून (Vegetable Market) घरी परत येत होते. वाटेत ओळखीचा माणूस भेटल्यानं तो त्याच्याशी बोलू लागला. भाजी खरेदी करताना आपण टोमॅटो (Tomato) घ्यायला विसरल्याचं त्याने त्या व्यक्तीला सांगितलं. त्यानं अनेक वेळा टोमॅटो शब्दाचा उल्लेख केला. त्याचदरम्यान महेश दासचा शेजारी असलेल्या ब्रह्मदेव दासची पत्नी रस्त्यावरून जात होती. महेश आपल्यालाच टोमॅटो म्हणत असल्याचा तिचा समज झाला. तिनं घरी जाऊन महेश दासनं आपल्याला टोमॅटो म्हणत आपला विनयभंग केल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यामुळे संतापलेल्या ब्रह्मदेव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी महेश यांच्या घरी जाऊन त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

  'इरादा नव्हता तरीही चिरावा लागला पोटच्या लेकरांचा गळा', सामूहिक हत्याकांड प्रकरणात धक्कादायक खुलासा

  ज्यावेळी ही मारहाणीची घटना घडली तेव्हा महेश दास आपल्या घरी बसले होते. त्यांचा शेजारी ब्रह्मदेव दास त्यांच्या घरी आला आणि शिवीगाळ करू लागला. त्यांनी विरोध केला असता त्यांनी महेश दासला मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान महेश दास जमिनीवर पडले आणि बेशुद्ध (Unconscious) झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारांसाठी तिलकारी गावातील रुग्णालयात दाखलं केलं मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. महेश दास यांच्या मृत्युची माहिती मिळताच आरोपीनं कुटुंबासह पलायन केलं.

  हवेली खरगपूरचे डीएसपी राकेश कुमार (DSP Rakesh Kumar) यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. फोनवर माहिती देताना कुमार यांनी सांगितलं की, 29 मार्च रोजी मृत व्यक्तीनं आरोपीच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याचा संशय होता. त्याच अनुषंगानं ही संपूर्ण घटना घडली आहे. याप्रकरणी एकूण सात जणांना आरोपी करण्यात आलं असून त्यापैकी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी छापे टाकण्यात येत आहेत.

  पुणे हादरलं! घर विकलं बापानं अन् जीव घेतला लेकानं; विकत घेणाऱ्या महिलेला जीव जाईपर्यंत मारहाण

  आरोपींनी मृत व्यक्तीला मारहाण केली होती. यादरम्यान धक्का लागल्यानं महेश दास खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या शरीरावर कोठेही जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack) महेश यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. शवविच्छेदन अहवाल (Autopsy Report) आल्यानंतरच हत्येचं खरं कारण स्पष्ट होईल. आरोपी ब्रह्मदेव दासला गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, या पूर्वीही तो एका खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात गेलेला आहे, असंही डीएसपी राकेश कुमार यांनी सांगितलं.

  याप्रकरणी महेशच्या पत्नीनं टेटियाबंबर पोलीस ठाण्यात (Tetiya Bamber Police Station) आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी ब्रह्मदेव दास, दिलीप दास, आकाश दास, पूजा देवी, पूनम देवी, सुबोध दास आणि त्याची पत्नी अशा सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत दोन महिलांना अटक झाली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितलं.

  First published:

  Tags: Bihar, Crime news, Murder news