Home /News /national /

'इरादा नव्हता तरीही चिरावा लागला पोटच्या लेकरांचा गळा', सामूहिक हत्याकांड प्रकरणात धक्कादायक खुलासा

'इरादा नव्हता तरीही चिरावा लागला पोटच्या लेकरांचा गळा', सामूहिक हत्याकांड प्रकरणात धक्कादायक खुलासा

Family Murder Case: पाच दिवसांपूर्वी एका कुटुंबातील चार सदस्यांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या सामूहिक हत्याकांडाचं (massacre) गूढ उलगडलं असून धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

    अहमदाबाद, 31 मार्च: पाच दिवसांपूर्वी एका कुटुंबातील चार सदस्यांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. थरकाप उडवणारी ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली होती. पण या हत्या कोणी आणि कोणत्या कारणासाठी केल्या, याबाबत गूढ बनलं होतं. बुधवारी गुन्हे शाखेनं या सामूहिक हत्याकांड प्रकरणाचा तपास सुरू केला असता धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मृत महिलेच्या पतीचं हे हत्याकांड घडवलं असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. संबंधित घटना पाच दिवसांपूर्वी गुजरातमधील अहमदाबाद याठिकाणी घडली होती. विनोद गायकवाड ऊर्फ विनोद मराठी असं संशयित आरोपीचं नाव असून त्यानं आपल्या पत्नीसह एक मुलगा आणि एक मुलगी तसेच आजेसासूची हत्या केली आहे. आरोपी विनोद हा मूळचा महाराष्ट्रातील असून सध्या इंदौरला पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद गायकवाड ऊर्फ ​​विनोद मराठी हा ओढव परिसरातच टेम्पो चालवण्याचं काम करतो. काही काळापासून तो आर्थिक अडचणींचा सामना करत असल्याने विनोद आणि त्याच्या पत्नीमध्ये भांडणं होत होती. अशात त्याला दारू पिण्याचंही व्यसन लागलं होतं. त्याचबरोबर त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावरही संशय होता. यातूनच त्याने आपल्या पत्नीसह कुटुंबाच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार आरोपीनं पत्नीसह दोन मुलं आणि आजेसासूची गळा चिरून हत्या केली. हेही वाचा-भरधाव SUVने पादचाऱ्याला चिरडलं, अंगावर काटा आणणारा VIDEO आला समोर लेकरांना मारण्याचा कोणताही इरादा नव्हता. पण आईच्या मृत्यूनंतर मुलं अनाथ होतील? या भितीतून आरोपीनं त्यांचा देखील गळा चिरला आहे. आरोपीनं कुटुंबातील सर्वांना गुंगीचं औषध देऊन त्यांचा गळा चिरला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. एवढंच नव्हे तर आरोपी विनोदने आपल्या घरापासून काही अंतरावर राहणाऱ्या सासूवर देखील प्राणघातक हल्ला केला होता. पण लेकीला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून सासूने ही गोष्ट लपवून ठेवली होती. हेही वाचा-एकाने भेटायला बोलावलं अन् चौघांनी नर्सवर केला बलात्कार, देशाला हादरवणारी घटना मात्र, मागील 4 दिवसांपासून मुलीला फोन करूनही ती प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे आईला संशय आला आणि त्यांनी याची पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस दिव्यप्रभा सोसायटीतील आरोपीच्या घरी पोहोचले असता, घरातून दुर्गंधी येत होती. फिर्यादी महिलेच्या मुलीच्या (विनोद मराठीची पत्नी)  मोबाइलवर फोन केला असता घरातून रिंगचा आवाज येत होता. त्यानंतर पोलिसांनी कुलूप तोडून पाहिलं असता घरात चार जणांचे मृतदेह दिसले. ज्यामध्ये दोन महिलांचे मृतदेह हॉलमध्ये तर दोन्ही मुलांचे मृतदेह बेडरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Gujrat, Murder

    पुढील बातम्या