जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / संतापजनक! चारित्र्याच्या संशयावरुन भररस्त्यात पत्नीची हत्या, लोक व्हिडीओ शूट करत राहिले

संतापजनक! चारित्र्याच्या संशयावरुन भररस्त्यात पत्नीची हत्या, लोक व्हिडीओ शूट करत राहिले

संतापजनक! चारित्र्याच्या संशयावरुन भररस्त्यात पत्नीची हत्या, लोक व्हिडीओ शूट करत राहिले

पतीनं केलेल्या हल्ल्यात गंभीर झालेली महिला रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच पडून राहिली. यादरम्यान आसपास असणाऱ्या लोकांनी तिचा व्हिडीओ (Video) बनवला, मात्र कोणीही तिला रुग्णालयात पोहोचवण्याचे कष्ट घेतले नाहीत.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ 28 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशच्या लखनऊमधून एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीनं आपल्याच पत्नीवर भररस्त्यात चाकूनं हल्ला (Knife Attack) केला. या हल्ल्यात गंभीर झालेली महिला रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच पडून राहिली. यादरम्यान आसपास असणाऱ्या लोकांनी तिचा व्हिडीओ (Video) बनवला, मात्र कोणीही तिला रुग्णालयात पोहोचवण्याचे कष्ट घेतले नाहीत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिचा मृत्यू झाला. ही घटना लखनऊच्या मडियाव क्षेत्रातील प्रीतिनगरमधील आहे. रफीकनं आपली पत्नी अफसाना हिच्यावर हल्ला केला. यानंतर अफसाना रस्त्यातच पडून राहिली. लोकांनी तिचा व्हिडीओ काढला मात्र मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही. महिलेला मृत घोषीत केल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे आणि लवकरच पुढची कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. आरोपी रफीकचं असं म्हणणं आहे, की त्याच्या पत्नीचे इतर कोणासोबत अवैध संबंध होते. त्यानं आपल्या पत्नीला असं करण्यास मनाई केली होती आणि आपण गावी जाऊ असं म्हटलं होतं. रफीकचं असं म्हणणं आहे, की त्याची पत्नी त्याला तलाकही देत नव्हती आणि त्याच्यासोबत गावी जाण्यासही ती तयार नव्हती. आरोपी रफीकनं सांगितलं, की त्याच्या पत्नीचं असं म्हणणं होतं की रोज असंच थोडं थोडं मरत राहू. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीनं आपल्या पत्नीवर हल्ला केला, यानंतर डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून याबद्दलची तक्रार दाखल होताच पुढील कारवाई सुरू करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान याप्रकरणी आरोपीची चौकशीही केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात