मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /5 वर्षांची मुलगी ज्या झाडाखाली खेळत होती, त्याच झाडाला बापाने घेतला गळफास, हादरवणारी घटना

5 वर्षांची मुलगी ज्या झाडाखाली खेळत होती, त्याच झाडाला बापाने घेतला गळफास, हादरवणारी घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पहिल्या पत्नीच्या निधन झाल्यानंतर दुसरी पत्नी घर सोडून निघून गेली होती.

  • Local18
  • Last Updated :
  • Ambikapur, India

निखिल मित्रा, प्रतिनिधी

अंबिकापूर, 27 मार्च : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. हत्या, आत्महत्या, तसेच प्रेम प्रकरणातून खुनाच्याही धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूरमध्ये एका व्यक्तीने (वय-30) आपल्या पाच वर्षांच्या मुलीला झाडाखाली बसवले आणि त्याच झाडाला गळफास लावून घेतला. पण त्याने हे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी ग्रामस्थांची चौकशी केल्यानंतर पिकअप वाहन नातेवाईकांना आणण्यासाठी बगीचा येथील सांबरबार गावात रवाना करण्यात आले आहे. ही घटना बतौली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवपारा येथील आहे. मृत हा पहाडी कोरवा समाजाचा आहे.

बटौली पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रमोद पांडे यांनी सांगितले की, गावकऱ्यांच्या चौकशीत मृताने दोन लग्न केल्याचे समोर आले आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले आहे. तर दुसरी पत्नी त्याला सोडून गेली होती. 23 मार्च रोजी मृत आपल्या मुलीसोबत कामाला जात असल्याचे सांगून कुटुंबातून निघाला होता. मृताची निष्पाप मुलगी वडिलांच्या मृतदेहाजवळ खेळत होती.

एकाशी लग्न, दुसऱ्यासोबत अफेअर, आणि तिसऱ्याशी...., महिलेची निर्घृण हत्या

याचदरम्यान, त्याने आपल्या पाच वर्षांच्या मुलीला झाडाखाली बसवले आणि त्याच झाडावर गळफास घेत आत्महत्या केली. त्याने हे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

First published:
top videos

    Tags: Chhattisgarh, Crime news, Death, Local18