मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /गणितात ‘बी’ ग्रेड दिल्याचा राग; 15 वर्षांनंतर विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचं अपहरण, पुढे जे केलं ते हादरवून सोडणारं

गणितात ‘बी’ ग्रेड दिल्याचा राग; 15 वर्षांनंतर विद्यार्थ्याकडून शिक्षिकेचं अपहरण, पुढे जे केलं ते हादरवून सोडणारं

फाईल फोटो

फाईल फोटो

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली 11 मार्च : शालेय जीवनामध्ये एखाद्या अवघड विषयात कमी गुण मिळाल्यामुळे खचून जाणारे पण पुढील प्रयत्नात चांगले गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी आपण पाहिले असतील. परंतु गणित विषयात शिक्षिकेने ‘बी’ ग्रेड दिल्याचा राग तब्बल 15 वर्षं मनात धरून अमेरिकेतील एका विद्यार्थ्याने शिक्षिकेचे तिच्या मुलीसह अपहरण केले आणि 53 दिवस अमानुष छळ केला. ही घटना अमेरिकेतील मेरी स्टॉफर या शिक्षिकेसोबत घडली.

  या संदर्भात ‘आज तक हिंदी’नं ‘डेली मेल’च्या हवाल्याने वृत्त दिलं आहे. विद्यार्थ्याने शिक्षिकेचे अपहरण केल्याच्या घटनेची आजही मोठ्या प्रमाणात चर्चा होते. 1960 ते 1970 च्या दशकात अमेरिकेतील मिनिसोटा येथे मेरी स्टॉफर नावाची शिक्षिका राहत असे. त्यांचा इर्व्ह यांच्याशी विवाह झाला होता. कालांतराने त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्य झाली. ख्रिश्चन धर्माचे पालन करणारे हे कुटुंब होतं. धार्मिक कार्यक्रमासाठी ते नेहमी फिलिपिन्स येथे जायचे.

  डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, 20 मे 1980 मध्ये फिलिपिन्सला जाण्याची तयारी सुरू होती. तत्पूर्वी 16 मे 1980 रोजी सकाळी 11 वाजता मेरी त्यांच्या आठ वर्षीय मुलगी बेथला सोबत घेऊन सलूनमध्ये गेल्या. दुपारी दीड वाजेदरम्यान दोघीही सलूनच्या बाहेर पडल्या आणि गाडीकडे जात असताना मेरीच्या पाठीमागून एक व्यक्ती आली व त्याने त्यांच्यावर बंदूक रोखली. सांगितलेले ऐकले नाही तर गोळी झाडण्याची धमकी त्या व्यक्तीने दिली अचानक घडलेल्या या घटनेने मेरी घाबरून गेल्या. दोघींनाही त्याने कारमध्ये बसवले आणि मेरीला कार चालवण्यास सांगून बेथला घेऊन ती व्यक्ती मागे बसली. त्याच्याकडे बंदूक असल्याने मेरी यांना ती व्यक्ती जे सांगेल त्याप्रमाणे वागावे लागत होते.

  हॉटेलमध्ये आधी जेवले, नंतर रूममध्ये गेले आणि... ; लव्ह स्टोरीचा भयानक शेवट

  गाडी चालत असताना एके ठिकाणी पोलीस तपासणी करत होते. त्यावेळी आपण वाचलो असे मेरी यांना वाटत असतानाच त्या व्यक्तीने पोलिसांसमोर काही सांगितलं तर तिथेच मुलीचा जीव घेऊ, अशी धमकी दिली. त्यामुळे मेरी पोलिसांसमोर शांत राहिल्या. पोलिसांच्या कचाट्यातून सुटल्यानंतर गाडी काही अंतर पुढे गेली तेव्हा त्या व्यक्तीने गाडी थांबवून दोघांनाही खाली उतरायला लावले व दुसऱ्या गाडीजवळ त्यांना तो घेऊन गेला. दोघींनाही गाडीच्या डिक्कीत बसायला सांगितले. डिक्कीत जागा अपुरी असताना त्याने दोघींनाही डिक्कीत कोंबून त्यांच्या तोंडावर टेप लावला. या घटनेवेळी दोन लहान मुले तिथे खेळत होती. त्यातील सहा वर्षांच्या जेसन विल्कमॅनने ‘काका तुम्ही काय करत आहात’ असा प्रश्न त्या व्यक्तीला विचारला होता.

  जेसनने पूर्ण घटना पाहिलेली असल्याने त्या व्यक्तीने त्यालाही मायलेकींसोबत त्याच डिक्कीमध्ये कोंबले. थोडे अंतर पार केल्यानंतर गाडी थांबवून तो जेसनला घेऊन गेला. काही वेळानंतर तो दोघींना घेऊन स्वतःच्या घरी गेला. तेथे पोहोचल्यानंतर तो लहान मुलगा कुठे आहे असा प्रश्न विचारल्यानंतर रस्त्यामध्ये त्याला सोडून दिल्याचे त्याने मेरी यांना सांगितले. त्या व्यक्तीने मेरी आणि बेथ या दोघांना एका खोलीत डांबून ठेवलं. या खोलीमध्ये दोन कपाट बनवण्यात आली होती. तिथे त्या व्यक्तीने मायलेकींना साखळदंडात बांधून टाकलं व वेगवेगळ्या कपाटात डांबले. कपाटात फक्त उभे राहण्या एवढीच जागा शिल्लक होती त्यात बिलकुलही हालचाल करता येत नव्हती.

  कपाटात रात्रभर उभा राहिल्या मायलेकी

  कपाटात डांबल्यानंतर मायलेकींना पूर्ण रात्र उभी राहून काढावी लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या व्यक्तीने एक लिस्ट तयार केली. दोघांना कपाटातून बाहेर काढत ती लिस्ट त्याने त्यांना दाखवली. त्यात काही नियम लिहिलेले होते. आता आयुष्यभर याच ठिकाणी तुम्हाला राहावे लागेल असे त्यानी दोघींनाही बजावले. मायलेकींना बांधण्यासाठी त्याने विशेषकरून साखळदंड तयार केले होते. यातून सहजासहजी सुटका शक्य नव्हती. आठवड्यातून एक दिवस स्नान करण्याची दोघींनाही परवानगी होती. दिवसभरातले एका वेळेसच जेवण मिळणार असल्याचे त्याने दोघींनाही सांगितले.

  बायको घरी अन् प्रेयसीला भेटायला गेला 3 लेकारांचा बाप, गावकऱ्यांनी पाहिलं आणि असं काही केलं की..

  अपहरणकर्ता होता मेरी यांचा विद्यार्थी

  अपहरणकर्त्याने एके दिवशी मेरी यांना वेगळ्या खोलीत नेले. तिथे खुर्चीवर बसवून त्यांच्यासमोर कॅमेरा लावला. स्वतः मात्र कॅमेराच्या पाठीमागे राहून तो रेकॉर्डिंग करत होता. त्याने मेरी यांना ‘तुम्ही मला ओळखता का?’ असा प्रश्न विचारला. यावर मेरी यांनी नकारार्थी उत्तर दिले. तेव्हा तो म्हणाला की, मी तुमचा विद्यार्थी आहे. नववीत असताना तुम्ही गणितात मला ‘बी’ ग्रेड दिली होती. याच कारणामुळे मला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. परिणामी चांगली नोकरीही मिळाली नाही इच्छा नसताना तैवानच्या सैन्यामध्ये मला नोकरी करावी लागली.

  पंधरा वर्षे मनात राग होता कायम

  गणितात बी ग्रेड दिल्याचा राग त्या अपहरणकर्त्याने 15 वर्ष मनात ठेवला होता. त्यावेळी त्याचे वय 14 वर्षे होते. तेव्हा मेरी या 20 वर्षांच्या होत्या. त्याने मेरी यांना तेव्हाचा फोटो दाखवला या फोटोत मेरी आणि ती व्यक्ती दिसत होते. त्या व्यक्तीने स्वतःचे नाव मिंग सेन शी असल्याचे सांगितले. सूड उगवण्यासाठी पंधरा वर्षे मी प्रतीक्षा करत होतो आणि या अपहरणाची तयारीही मी तेव्हापासून सुरू केली होती, असे त्याने मेरी यांना सांगितले.

  दररोज करायचा अत्याचार

  जुन्या गोष्टी सांगितल्यानंतर मिंगपे मेरी यांना विवस्त्र होण्यास सांगितले आणि त्यांच्यावरती अत्याचार केला. यानंतर सातत्याने तो शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. आता आपली या जाचातून सुटका होणार नाही असे मेरी यांनी गृहित धरले होते. मुलीलाही तो संपवून टाकणार असे मेरी यांना वाटत होते. मुलीच्या सुरक्षिततेसाठी मिंग जे जे सांगायचा ते मेरी यांना ऐकावे लागत होते.

  अशी झाली सुटका

  प्रचंड छळ होत असताना एक एक दिवस असाच निघत होता. एके दिवशी मिंगने मेरी यांना शॉपिंगला घेऊन जाण्याचे ठरवले. बाजारात गेल्यानंतर कोणाची तरी मदत मिळेल, अशी आशा मेरी यांना वाटली. परंतु तसे झाले नाही. तो मेरी यांना शॉपिंगला तर घेऊन गेला. परंतु बेथला गाडीत कोंबले होते. अपहरण झाल्याच्या 53 व्या दिवशी मिंग नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेला होता. त्या दिवशी मेरी यांचे साखळदंड ढिले झाल्याचे त्यांना जाणवले. हिच संधी साधत मेरी यांनी साखळदंडातून स्वतःची सुटका करून घेतली आणि पोलिसांना फोन करून याची सूचना दिली. पोलिस घटनास्थळावर आले आणि मायलेकींना त्यांनी मुक्तता केली.

  कोर्टातही मेरी यांच्यावर जीवघेणा हल्ला

  पोलिसांनी मेरी आणि बेथ यांची सुटका केल्यानंतर मिंगला अटक केली. त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले. तेव्हा मिंगने चकित करणारे अनेक खुलासे केले. अपहरण करताना ज्या जेसनने त्याला पाहिले होते त्याचा त्याने आधीच खून केला होता. मेरीवर तो प्रचंड चिडलेला होता. कारण नववीत असताना गणितात मेरीने त्याला बी ग्रेड दिला होता. त्यामुळे पंधरा वर्षांपर्यंत त्यांनी राग मनात ठेवला. याच कालावधीत त्याने अपहरण करण्याची तयारी केल्याचे कोर्टासमोर त्याने मान्यही केले. कोर्टातही त्याने मेरी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. परंतु पोलिसांनी त्याला वेळीच रोखले.

  ‘मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, दीर्घ सुनावणीनंतर कोर्टाने मिंगला 30 वर्षांची शिक्षा सुनावली. 2010 मध्ये तो जामीन घेऊ शकत होता. परंतु अजूनही मिंगपासून जीवाला धोका असल्याचे मेरी यांनी कोर्टाला सांगितल्यानंतर त्याचा जामीन नामंजूर झाला. सध्या मिंग तुरूंगात शिक्षा भोगत आहे. या घटनेवर 2019 मध्ये Abducted : The Mary Stauffer Story हा चित्रपटही आला आहे.

  First published:

  Tags: Crime news, Kidnapping