• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • क्रिकेट खेळताना घडलं अघटित; दोन तरुणांचा मॅचदरम्यान मृत्यू, कुटुंबाला बसला धक्का

क्रिकेट खेळताना घडलं अघटित; दोन तरुणांचा मॅचदरम्यान मृत्यू, कुटुंबाला बसला धक्का

रविवारी सुट्टी असल्याने चौघेजण क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडले होते.

 • Share this:
  नोएडा, 25 जुलै: रविवारी खेळलेली ती क्रिकेट मॅच त्या तरुणांच्या आयुष्यातील शेवटची मॅच ठरली. नोएडामध्ये रविवारी क्रिकेट खेळत असताना एक मोठा अपघात झाला. येथे क्रिकेटचा बॉल सीव्हर प्लाटंच्या टँकमध्ये जाऊन अकडला. यानंतर काही तरुण बॉल शोधण्यासाठी सीवर टँकमध्ये उतरले. यादरम्यान सीवरमधील गॅसमुळे चार तरुण तेथच बेशुद्ध झाले. दुर्देवाने या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. आणि अन्य दोघांवर उपचार सुरू आहे. (Death of two who went to play cricket ) रविवारी नेमकं काय घडलं? रविवारी सकाळी चार तरुण क्रिकेट खेळण्यासाठी घराबाहेर पडले. काही वेळानंतर बॉल सीवर प्लांटच्या टँकमध्ये जाऊन अडकला. एक एक करीत तरुण बॉल काढण्यासाठी टँकमध्ये उतरले. त्यावेळी टँक ऑपरेटरने तरुणांना अडवलं, मात्र त्यांनी ऐकलं नाही. पाहता पाहता चारही तरुण टँकमध्ये बेशुद्ध झाले. यानंतर शेजारी उभा असलेला रिक्षा चालक आणि ऑपरेटरने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. हे ही वाचा-शाळेत यायला उशीर झाल्यानं चिमुकलीला जबरी शिक्षा; प्रकृती खालावल्यानं झाला खुलासा काही वेळानंतर स्थानिकांच्या मदतीने चौघांना रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र उपचारदरम्यान दोन तरुणांना मृत घोषित करण्यात आलं. तर अन्य दोन तरुणांची प्रकृती गंभीर आहे. नोएडा पोलिसांनी सांगितलं की, रविवारी सकाळी हे तरुण क्रिकेट खेळत होते. यावेळी त्यांच्याकडील बॉल सीवर प्लांटच्या टँकमध्ये अडकला. बॉल काढण्यासाठी खाली उतरले त्यावेळी सीवर टँकमधील विषारी वायूमुळे ते बेशुद्ध झाले. ही घटना घडली तेव्हा शेजारीला ऑपरेटरने त्यांना तातडीने बाहेर काढलं. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं.
  Published by:Meenal Gangurde
  First published: