जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / मोबाईल गेमनं केला घात! उधारीचे पैसे परत केले नाहीत म्हणून अल्पवयीन मुलाची गळा आवळून हत्या

मोबाईल गेमनं केला घात! उधारीचे पैसे परत केले नाहीत म्हणून अल्पवयीन मुलाची गळा आवळून हत्या

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

एका गेममुळे अल्पवयीन मुलाला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

उज्जैन (मध्यप्रदेश), 11 जुलै: मोबाईल गेममुळे (Mobile Games) लहान मुलं अक्षरशः वेडे झाले आहेत. याचं वेड लागण मुलांना इतकं आहे की याचा परिणाम त्यांच्या जीवनावर होण्यास सुरुवात झाली आहे. काही गेम्समुळे मुलं आत्महत्या करत आहेत तर काही गुन्हेगारी (Crime News) प्रवृत्तीकडे जात आहेत. आता मध्यप्रदेशातील उज्जैनमधेही (Ujjain) असाच प्रकार समोर आला आहे. एका गेममुळे अल्पवयीन मुलाला स्वतःचा जीव गमवावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रितेश गुर्जरवाड़िया वय वर्षे 17 असं हत्या करण्यात आलेल्या बालकाचं नाव आहे. गेमच्या टॉप अपसाठी शेजारच्या तरुणांकडून त्यानं 5 हजार रुपये घेतले होते. जेव्हा पैसे परत मिळू शकले नाहीत तेव्हा शेजार्‍याशी भांडण झालं. हे प्रकरण इतकं वाढलं की शेजाऱ्याने याचा गळा आवळून खून केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  रितेश गुर्जरवाडिया रा. शिव कॉलनी बेरचा रोड इथे राहणारा तो ११ वीचा विद्यार्थी होता. तो  PUBG आणि FREE FIRE गेमसाठी वेद होता खेळाची लेव्हल ओलांडण्यासाठी रितेशनं टॉप अप केलं होतं. यासाठी शेजारच्या तरुणांकडून 5 हजार रुपये घेतले होते. हे वाचा - भंडारदरा येथे मद्यधुंद पर्यटकांचा जोरदार राडा, पोलिसांना अरेरावी करत मारहाण शुक्रवारी रात्री सात वाजता रितेश आपल्या कराटेच्या क्लासला जातो असं सांगून मित्रांसह बाहेर गेला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास वडील राधेश्याम गुर्जरवाडिया यांच्या मोबाइलवर रितेशच्या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. अनोळखी व्यक्तीनं रितेशचं अपहरण झाल्याचं सांगत एक लाख रुपयांची खंडणी मागितली. यानंतर कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. शनिवारी सायंकाळी अज्ञात क्रमांकावरून राधेश्यामच्या मोबाइलवर कॉल आला. कॉलर म्हणाला की, ‘तुमच्या मुलाचा मृतदेह बीसीआय कॉलनीत पडला आहे, घेऊन जा.’ ‘हे ऐकून वडील तातडीनं पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांना रितेशचा विकृत मृतदेह इथे पडला होता.बिर्ला गाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिघडलेल्या बीसीआय कॉलनीत रितेशचा मृतदेह सापडला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आरोपीचा शोध सुरु केला. रविवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याची चौकशी सुरू आहे. आरोपी नक्की कोण आहे याबाबत अजूनही माहिती मिळू शकली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात