मराठी बातम्या /बातम्या /ahmednagar /

भंडारदरा परिसरात मद्यधुंद पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला; मग पोलिसांनीच उतरवली तळीरामांची झिंग

भंडारदरा परिसरात मद्यधुंद पर्यटकांचा पोलिसांवर हल्ला; मग पोलिसांनीच उतरवली तळीरामांची झिंग

Policemen beaten by drunk tourist: दारूच्या नशेत पर्यटकाने पोलिसांना अरेरावी करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Policemen beaten by drunk tourist: दारूच्या नशेत पर्यटकाने पोलिसांना अरेरावी करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Policemen beaten by drunk tourist: दारूच्या नशेत पर्यटकाने पोलिसांना अरेरावी करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Published by:  Sunil Desale
अहमदनगर, 11 जुलै: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पर्यटनस्थळांवर बंदी (Tourist spot) घालण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही अतिउत्साही नागरिक पर्यटनस्थळी गर्दी करत असल्याचं पहायला मिळत आहे. अहमदनगरमधील प्रसिद्ध असलेल्या भंडारदरा धरण (Bhandardara Dam) परिसरातही अशाच प्रकारे शनिवारी एकच मोठी गर्दी केली होती. यावेळी मद्यधुंद पर्यंटकांनी चक्क पोलिसांवरच हात उचलल्याचा (Drunk tourist beaten Policemen) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झालं असं की, शनिवारी भंडारदरा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केली होती. यावेळी धरणात एक पर्यटक बुडाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. धरण परिसरात बुडालेल्या पर्यटकांचा पोलिसांनी शोध घेतला मात्र, त्या पर्यटकाबाबत काहीच माहिती मिळाली नाही. यावेळी तेथील मद्यधुंद असलेल्या पर्यटकांनी पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी स्थानिक दुकानदारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता पर्यटकांनी त्या दुकानदारालाच मारहाण केली. मग पोलिसांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न करताच दारूच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी पोलिसांनाच अरेरावी करत त्यांच्यावर हात उचलला. हा सर्व प्रकार पाहताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली आणि या पर्यटकांना पकडले. यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागवत या पर्यटकांना पोलीस ठाण्यात नेले. शनिवारी धबधब्यावर बुडून एकाचा मृत्यू पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे एका धबधब्यावर पिकनिकसाठी गेलेल्या 45 वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जव्हारमधली केळीचापाडा येथील काळमांडवी धबधब्यावर शनिवारी सकाळपासूनच पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. याच धबधब्यावर एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला आहे. धबधब्यावर पोहोण्यासाठी गेलेल्या 45 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव आदर्श धर्मा शंकर असे असल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतील तो निवासी असल्याचं बोललं जात असून तो आपल्या मित्रांसोबत पिकनिकसाठी जव्हारमधील धबधब्यावर आला होता.
First published:

Tags: Ahmednagar, Crime

पुढील बातम्या