जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / ठाण्यात महिलेवर चाकू हल्ला करत एकाची आत्महत्या, घटनेचं कारण आलं समोर

ठाण्यात महिलेवर चाकू हल्ला करत एकाची आत्महत्या, घटनेचं कारण आलं समोर

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

युवकानं 33 वर्षीय महिलेवर चाकूनं हल्ला (Knife Attack on Woman) केला आहे. या हल्ल्यानंतर 54 वर्षीय शोभराज राघनी यानं स्वतःही हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या (Man Commits Suicide) केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे 26 मार्च : गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. अशात आता ठाण्यातून (Thane Crime) आणखी एक घटना समोर आली आहे. ठाण्यात एका युवकानं 33 वर्षीय महिलेवर चाकूनं हल्ला (Knife Attack on Woman) केला आहे. या हल्ल्यानंतर 54 वर्षीय शोभराज राघनी यानं स्वतःही हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या (Man Commits Suicide) केली आहे. ही हदरवणारी घटना बुधवारी ठाण्यातील बाळकुम नाका परिसरात घडली आहे. हल्ला झालेली 33 वर्षीय महिला ठाण्याच्या सावरकरनगर परिसरात राहाते. तर, आत्महत्या केलेला शोभराज राघनी कल्याणमधील रहिवासी होता. या दोघांची पाच वर्षापूर्वी एकमेकांसोबत ओळख झाली. शोभराज आणि महिलेनं बुधवारी बाळकुम येथील एका हॉटेलमध्ये रुम भाड्यानं घेतली. मात्र, काही कारणांवरुन दोघांमध्ये वाद सुरू झाला. या वादातूनच शोभराजनं महिलेवर चाकूनं हल्ला केला. यानंतर त्यानं स्वतःदेखील रुमच्या खिडकीतून उडी मारली. डोक्याला मार लागल्यानं या घटनेत शोभराजचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती कापूरबावडी पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. खासगी रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू आहेत. तसंच सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणी कापूरबावडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस सध्या करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात