कल्याण, 21 जून : कल्याणमधील (Kalyan) एक तरुण एका तरुणाला आणि एका विवाहितेला काकांच्या अंत्यसंस्काराला येणं चांगलंच महागात पडलं आहे. अंबरनाथमध्ये एका कंपनीत काम करणारी विवाहिता आणि एक तरुण चार वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाले. मात्र यातील बेपत्ता तरुण आपल्या काकांच्या अंत्यविधी साठी कल्याणमध्ये आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. अंबरनाथमध्ये (Ambarnath) एका कंपनीत कल्याण पश्चिमेतील रोहिदास वाडा परिसरात राहणारा शाहबाज शेख काम करीत होता. त्याच्यासोबत अंबरनाथमध्ये राहणारी ही विवाहिता सीमा कोष्टी काम करीत होती. पतीसोबत राहणारी सीमा 30 मे 2017 रोजी आपल्या मनमाड (Manmad) येथील माहेरुन अंबरनाथ येथे परत येण्यासाठी ट्रेनमध्ये बसली आणि अचानक गायब झाली. ती हरविल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी मनमाड पोलिस ठाण्यात केली. हे वाचा - LIC कन्यादान पॉलिसी: 130 रुपये भरा आणि मुलीच्या लग्नासाठी मिळवा 27 लाख रुपये पोलिसांनी सिमाचा तब्बल चार वर्षे शोध घेतला, मात्र काहीच हाती लागले नाही. या दरम्यान कल्याणमध्ये राहणारा अरबाज शेख हा तरुणदेखील याच वेळी अचानक बेपत्ता झाला होता. तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्यात केली. या दोघांना मनमाड आणि बाजारपेठचे पोलिस शोधत होते. दोन दिवसापूर्वीच कल्याण पश्चीमेतील रोहिदास वाडा येथे एका व्यक्तिचा मृत्यू झाला ती मृत व्यक्ती बेपत्ता असलेल्या अरबाज याचा काका होता. काका मृत्यूची बातमी कळताच अरबाज घरी आला. त्याच्यासोबत सना नावाची त्याची पत्नी होती. ही गुप्त माहिती मिळताच बाजारपेठचे पोलिस त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी अरबाजला ताब्यात घेतले. जेव्हा पोलिसांनी अरबाज सोबत असलेल्या पत्नीविषयी विचारणा केली असता सना म्हणून त्याच्या सोबत असलेली त्याची पत्नी ही बेपत्ता झालेली सिमा आहे. जी मनमाडहून 2017 साली बेपत्ता होती. हे दोघे लग्न करुन कोन गाव परिसरात राहत होते. प्रेम प्रकरणातून लग्न करुन हे दोघे पसार झाले. दरम्यान या सगळ्यामुळे पोलिस देखील चक्रावून गेले. दरम्यान अरबाज आणि सीमा यांनी लग्न केले असून त्यासंदर्भात कोणाची काही तक्रार प्राप्त झाली नसल्याची माहिती पोलीस अधिकारी सुनिल पवार यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.