जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / दिवसाढवळ्या फक्त 10-15 मिनिटांत चोरी करून फरार व्हायचे, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

दिवसाढवळ्या फक्त 10-15 मिनिटांत चोरी करून फरार व्हायचे, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

दिवसाढवळ्या फक्त 10-15 मिनिटांत चोरी करून फरार व्हायचे, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या

मुबईत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई, 17 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यातच आता मुबईत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील मालाड पोलिसांनी आंतरराज्य घरफोडी टोळीला अटक केली आहे. या टोळीकडून 10 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी दिल्लीहून येऊन मुंबईत दिवसाढवळ्या घरात घुसायचे आणि अवघ्या 10 ते 15 मिनिटांत चोरी करून फरार व्हायचे. त्यांनी मुंबईसह मीरा भाईंदर, अंधेरी बोरवली उशिवारामध्ये आणि अशा विविध ठिकाणी घरफोडी केली आहे. 5 ते 7 घटना घडवून हे आरोपी दिल्लीला फरार झाले होते. मालाड येथील एका वृद्ध दाम्पत्याच्या घरावर भरदिवसा दरोडा टाकून ही आंतरराज्य घरफोडी टोळी फरार झाली होती. त्यानंतर मालाड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या मदतीने आरोपी ट्रेनमधून दिल्लीला जात असल्याची माहिती मिळाली. मालाड पोलिसांच्या पथकाने जीआरपीशी संपर्क साधून आरोपीला मध्य प्रदेशातील रतलाम स्टेशन येथून वस्तूंसह अटक केली. हेही वाचा -  सासरच्या मंडळींकडून छळ, तर मानसिक विकलांग मुलाचीही काळजी, महिलेचा भयानक निर्णय अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी हे हिस्ट्री शीटर असून त्यांच्यावर दिल्लीत सुमारे 100 गुन्हे दाखल आहेत. आरोपी निजाम निसार शेख (46), अक्सर समहुन शेख (28) आणि अन्वर समहुन शेख (38) हे जहांगीरपुरी, नवी दिल्ली येथील रहिवासी आहेत. या आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, चोरीमध्ये वापरलेली हत्यारे, कट चावी जप्त करण्यात आली आहे. याची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. हे आरोपी दिवसाढवळ्या अवघ्या 10 ते 15 मिनिटांत घर फोडून फरार व्हायचे. चोरी करण्याच्या पूर्वी परिसराची रेकी करायचे. तसेच जिथे सीसीटीव्ही आणि वॉचमन नाही, तिथे ते घटना घडवून आणायचे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात