मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Maharashtra Weather Forecast : निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्र तापला! चंद्रपूर टॉपला तर औरंगाबाद एंडला, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?

Maharashtra Weather Forecast : निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्र तापला! चंद्रपूर टॉपला तर औरंगाबाद एंडला, तुमच्या जिल्ह्यातील तापमान किती?

फाईल फोटो

फाईल फोटो

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या आधी महाराष्ट्र तापल्याचे पाहायला मिळत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 फेब्रुवारी : येत्या काही दिवसात पुण्यात पोटनिवडणुका होत आहेत. या पोटनिवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापण्याआधीच सध्या महाराष्ट्र तापल्याचे दिसत आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रातील तापमानाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यावरुन अनेक जिल्ह्यातील तापमान पाहिल्यावर तेथे उन्हाच्या झळा लागल्याचे दिसत आहे.  

सध्या सर्वत्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. वातावरणात देखील त्या बाबत कमालीचा बदल जाणवत असून उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच चांगले उन तापायला सुरुवात झाली आहे. एकंदरित कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या आधी महाराष्ट्र तापल्याचे पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील तापमान हे 35 अंशांच्या वर गेले आहे. हवामान विभागाने जाहीर केलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे -

महाराष्ट्र Tmax >35°C on 22 Feb:

सांगली 36.3

कोल्हापूर 35.6°c

जालना 35.8

नाशिक 35.5

औरंगाबाद 35.4

पुणे 35.7

सातारा 35.8

उद्गीर 35.8

सोलापूर 37

परभणी 36.1

जेऊर 36

ओसबाड 36

नांदेड 37.2

जळगाव 36.6

हेही वाचा - प्राथमिक शिक्षक असलेल्या प्रियकराने प्रेयसीला संपवले, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड, अहमदनगर हादरलं!

महाराष्ट्रात दिवसा उन्हाच्या झळा असह्य होत आहेत तर रात्री थंडीचा कडाका सहन होत नसल्याचे सध्या चित्र आहे. दरम्यान मागच्या तीन दिवसांपासून दिवसा उन्हाच्या झळा वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागच्या 24 तासांत सोलापुरात 37.4 अंश एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर आणखी दोन दिवस उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून त्यानंतर पुन्हा गारवा जाणवणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात अचानक कमाल तापमानात वाढ झाली आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसत आहेत. राज्यात उन्हाचा चटका सातत्याने वाढत आहे यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. तर अचानक रात्री थंडी वाढत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

First published:
top videos

    Tags: Rise in temperatures, Todays Weather, Weather, Weather Forecast, Weather Update