जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / 100 कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रांचीतून अटक, असा लावला ठगाचा शोध

100 कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रांचीतून अटक, असा लावला ठगाचा शोध

100 कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला रांचीतून अटक, असा लावला ठगाचा शोध

तपास अधिकाऱ्यांनी अशा सर्व गुंतवणूकदारांना प्रसारमाध्यमांद्वारे विनंती केली आहे की, जर तुम्हीही या ठगानं केलेल्या फसवणुकीला बळी पडला असाल तर, तुम्ही आचोलो पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवावी. जेणेकरून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळू शकेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

पालघर, 2 एप्रिल : वसई-विरार संकुलात राहणाऱ्या हजारो नागरिकांची फसवणूक (Mumbai fraud case) करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. नालासोपारा येथील आचोलो पोलिसांनी (Acholo police) झारखंडची राजधानी रांची (Ranchi) येथून त्याला ताब्यात घेतलं. ईगल लाईट या कंपनीत ठेवींवर जास्त व्याज देण्याचं आमिष दाखवून त्यानं अनेकांची फसवणूक केली होती. गोविंद सिंह असं या महाठगाचं नाव आहे. फसवणुकीला बळी पडलेल्या लोकांनी आचोलो पोलिसात त्याची तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल ट्रेस करून त्याला अटक केली. हे वाचा -  आयटीआयचं शिक्षण घेणाऱ्या बहिणींनी रेल्वेतून मारली उडी;मुंबईला येताना जीवन संपवलं या प्रकरणाची माहिती देताना आचोलो पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले की, आरोपीला रांची येथून अटक केली आहे. आरोपी वसई-विरारसह रांची येथे ईगल लाईट कंपनीची शाखा उघडून तो साध्या नागरिकांची फसवणूक करत होता. गोविंद सिंह याला अटक करून फसवणूक प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी अशा सर्व गुंतवणूकदारांना प्रसारमाध्यमांद्वारे विनंती केली आहे की, जर तुम्हीही या ठगानं केलेल्या फसवणुकीला बळी पडला असाल तर, तुम्ही आचोलो पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवावी. जेणेकरून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळू शकेल. हे वाचा -  पुणे: शिक्षिका बाथरूममध्ये जाण्याआधी आत ठेवायचा फोन अन्..;मुलाचं धक्कादायक कृत्य ठग गोविंदसिंहला बळी पडलेल्या अनेक नागरिकांनी अनामत (डिपोझिट) रक्कम गमावल्यानंतर आपल्या व्यथा कॅमेऱ्यासमोर मांडल्या. त्यांनी थोड्याशा लालसेनं आपलं आयुष्य उद्ध्वस्त कसं केलं, हे सांगितलं. काहींची पत्नी त्यांना सोडून निघून गेली. तर, काहींच्या स्वप्नांचा चुराडा झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात