जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकरांनी केली कोट्यवधींची फसवणूक, निकटवर्तीयाचा गंभीर आरोप

खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकरांनी केली कोट्यवधींची फसवणूक, निकटवर्तीयाचा गंभीर आरोप

माढा मतदार संघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर

माढा मतदार संघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर

Money Fraud Case: माढा मतदार संघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी 3 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांच्याच एका निकटवर्तीयाकडून करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सातारा, 02 मार्च: माढा मतदार संघाचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर (MP Ranjeet Singh Naik Nimbalkar) यांनी 3 कोटी 40 लाख रुपयांची फसवणूक (3.4 Crore fraud) केल्याचा आरोप त्यांच्याच एका निकटवर्तीयाकडून करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी आरोप केल्यानंतर माढा मतदार संघात आणि फलटण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपानंतर नाईक निंबाळकरांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच संबंधित आरोप खोटे असून तक्रारदारकडेच माझ्या कारखान्याचे 7 कोटी रुपये देणं बाकी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नेमकी कोणी कुणाची फसवणूक केली, याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. दिगंबर आगवणे (Digambar Agawane) असं तक्रारदाराचं नाव असून ते फलटणमधील उद्योजक आहेत. शिवाय ते खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचे सर्वात निकटवर्तीय मानले जातात. दिगंबर आगवणे यांनी फलटण मतदार संघातून तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यांचं नाईक निंबाळकरांशी खूपच जिव्हाळ्याचे संबंध होते. पण आर्थिक व्यवहारातून त्यांच्या मैत्रीला तडा गेला असून हे प्रकरण आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं आहे. हेही वाचा- यशवंत जाधव यांच्या डायरीत दडलंय काय? इन्कम टॅक्सच्या धाडीत झाला मोठा खुलासा नेमकं प्रकरण काय आहे? आगवणे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, गेल्या दहा वर्षात माढ्याचे खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर आणि दिगंबर आगवणे यांच्यात अनेक आर्थिक व्यवहार झाले आहेत. या व्यवहारांमध्ये 3 कोटी 40 लाख रुपये खा.निंबाळकर यांच्याकडून येणं अपेक्षित होतं. पण ते मिळालेले नाहीत. दिगंबर आगवणे यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. शिवाय मला न्याय मिळाला नाही, तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्यार नसल्याचं आगवणे यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. याबाबत रीतसर अर्ज करून जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. हेही वाचा- एक कोटी गुंतवणुकीच्या बदल्यात हातावर टेकवला अडीच कोटींचा बनावट चेक, पुण्यातील महिलेसोबत घडलं विपरीत ही तक्रार दाखल झाल्यानंतर स्वत: खासदार नाईक निंबाळकरांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच दिगंबर आगवणे यांच्याकडे आपल्या कारखान्याचे 7 कोटी रुपये देणं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सर्व आरोपांचे खंडन करत खासदारांनी आगवणे म्हणजे ‘मिस्टर नटवरलाल’ आहेत, असंही म्हटलं आहे. एकेकाळी खासदार निंबाळकर यांचे सर्वात निकटवर्तीय असलेल्या आागवणे यांनीच हे आरोप केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस प्रमुख अजय कुमार बंसल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. या घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात