Home /News /pune /

एक कोटी गुंतवणुकीच्या बदल्यात हातावर टेकवला अडीच कोटींचा बनावट चेक, पुण्यातील महिलेसोबत घडलं विपरीत

एक कोटी गुंतवणुकीच्या बदल्यात हातावर टेकवला अडीच कोटींचा बनावट चेक, पुण्यातील महिलेसोबत घडलं विपरीत

Crime in Pune: पुण्यानजीक असणाऱ्या लोणी काळभोर याठिकाणी एका उद्योजक महिलेसोबत विचित्र प्रकार घडला आहे. संबंधित महिलेला दोन जणांनी दुप्पट परताव्याचं आमिष दाखवून (Lure of double profit) त्यांची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक (1 Crore fraud) केली आहे.

पुढे वाचा ...
    पुणे, 27 फेब्रुवारी: पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या लोणी काळभोर याठिकाणी एका उद्योजक महिलेसोबत विचित्र प्रकार घडला आहे. संबंधित महिलेला दोन जणांनी दुप्पट परताव्याचं आमिष दाखवून (Lure of double profit) त्यांची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक (1 Crore fraud) केली आहे. कहर म्हणजे आरोपींनी परतावा म्हणून फिर्यादी महिलेला बंद खात्याचा चेक दिला आहे. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर, महिलेनं लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून पुढील तपास केला जात आहे. रवि कानकाटे ऊर्फ रविंद्र मुरलीधर भोसले ऊर्फ जगीश मुरलीधर भोसले आणि स्वप्नील कानकाटे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं असून ते हवेली तालुक्यातील कोरेगाव परिसरातील इनामदार वस्तीतील रहिवासी आहेत. तर ममता सिंह मलिक असं फसवणूक झालेल्या महिला उद्योजिकेचं नाव आहे. फिर्यादी ममता या सध्या कोरेगाव परिसरात वास्तव्याला असून त्या मूळच्या उत्तर प्रदेशातील मुरादाबादच्या रहिवासी आहेत. फिर्यादी ममता यांचा प्युरिस्टीक न्युट्रीशियन नावाचा सेंद्रिय उत्पादन व विक्रीचा व्यवसाय आहे. हेही वाचा-रात्रीचं जेवण केलं अन् मृत्यूच्या दाढेत अडकलं कुटुंब, आईसह 3 लेकरांचा भयावह अंत दरम्यान आरोपी रवी आणि स्वप्नील कानकाटे हे दोघं आयुर्वेदिक न्यूट्रीशियन बाबत चौकशी करण्यासाठी ममता यांच्या ऑफिसमध्ये आले होते. यावेळी त्यांनी काही उत्पादनं देखील खरेदी केले होते. त्यानंतर आरोपींचं ममता यांच्या ऑफिसमध्ये येणं-जाणं सुरू झालं. काही दिवसांनंतर आरोपींनी शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास डबल रक्कम मिळेल, असं आमिष दाखवलं. तसेच रवि हा माझा भाऊ असून त्यास तुम्ही पैसे द्या त्याची सर्व जबाबदारी मी घेतो, असं सांगत स्वप्नीलनं आणि रविनं फिर्यादींचा विश्वास संपादन केला. हेही वाचा-पतीनं हात पकडले अन् प्रेयसीनं केले वार; अनैतिक संबंधातून पत्नीसोबत गाठली क्रूरता त्यानंतर आरोपींनी वेळोवेळी धनादेश,  ऑनलाईन ट्रान्सफर, गुगल पे, एनईएफटी, आरटीजीएसद्वारे बँक खात्यावर आणि रोख स्वरुपात असे एकूण 1 कोटी रुपये दिले. सुरुवातीच्या काळात परतावा म्हणून आरोपींनी काही रक्कम परत केली. त्यानंतर संपूर्ण रक्कमेचा परतावा म्हणून आरोपींनी एचडीएफसी बँकेचा अडीच कोटींचा चेक देऊ केला. संबंधित चेक घेऊन फिर्यादी बँकेत गेल्या असत्या हा चेक बंद पडलेल्या खात्याचा असल्याचं लक्षात आलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, महिलेनं लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Money fraud, Pune

    पुढील बातम्या