मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

LPU विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाला नवा ट्वीस्ट, सुसाईड नोटमध्ये प्राध्यापकाचं नाव

LPU विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणाला नवा ट्वीस्ट, सुसाईड नोटमध्ये प्राध्यापकाचं नाव

या घटनेचे कारण माहिती नसल्यामुळे काल इतर सहकारी विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता.

या घटनेचे कारण माहिती नसल्यामुळे काल इतर सहकारी विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता.

या घटनेचे कारण माहिती नसल्यामुळे काल इतर सहकारी विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता.

  • Published by:  News18 Desk
फगवाडा, 21 सप्टेंबर : मंगळवारी लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये डिझायनिंगच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी इजिन एस दिलीप कुमार याने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. या आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्याची सुसाईड नोट पोलिसांना सापडली आहे. यामध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याने आपल्या मृत्यूसाठी एनआयटी कालिकत येथील प्राध्यापकाला जबाबदार धरले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - इजिनने एस. दिलीप कुमार हा मूळचा केरळचा रहिवासी होता. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास त्याने आत्महत्या केली. यानंतर रात्री उशिरापर्यंत विद्यापीठात चांगलाच गोंधळ सुरू होता. कौटुंबिक त्रासातून तरुणाने हे पाऊल उचलल्याचे त्यावेळी पोलिसांकडून सांगण्यात येत होते. मात्र, यानंतर आज त्याची सुसाईड नोट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विद्यार्थ्याने आपल्या मृत्यूला एनआयटीचा एक प्राध्यापक जबाबदार असल्याचे म्हटले आहे. विद्यापीठाने दिले स्पष्टीकरण - विद्यार्थी इजिन एस दिलीप कुमार यांच्या आत्महत्येची ही घटना दुर्दैवी आहे, असे लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या दुर्दैवी घटनेची बातमी सांगताना आम्हाला दुःख होत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि सापडलेल्या सुसाईड नोटवरून विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. त्याने दोन वर्षे शिक्षण घेतलेल्या एनआयटी कालिकत (केरळ) येथील त्याच्या मागील संस्थेत वैयक्तिक अडचणींचा सामना केला होता. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेचे कारण माहिती नसल्यामुळे काल इतर सहकारी विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता. त्यामुळे सायंकाळी उशिरा विद्यापीठ कॅम्पसमध्ये अशांतता पसरली होती. मात्र, पोलीस आणि विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली आहे. आता विद्यापीठात शांतता आहे. तसेच सर्व विद्यार्थी आता शांततेने वर्गात हजेरी लावत आहेत आणि परीक्षाही देत ​​आहेत, असेही विद्यापीठाने म्हटले आहे. सुसाईड नोट
सुसाईड नोट
हेही वाचा - विमानतळावर CISF ने आमदाराला रोखलं, मोठी रोकड जप्त, आयकर विभाग घटनास्थळी या घटनेनंतर मंगळवारी रात्री मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी विद्यापीठात निदर्शने सुरू केली होती. रात्री उशिरापर्यंत ही निदर्शने सुरू होती. मात्र, त्यानंतर कोणत्याही प्रकारे विद्यार्थ्याच्या आत्महत्येमागील कारणे स्पष्ट होऊ शकली नाहीत. आता विद्यार्थ्याची सुसाईड नोट सापडल्यानंतर परिस्थिती स्पष्ट झाली आहे.
First published:

Tags: Crime news, Death, Punjab, Student

पुढील बातम्या