जाहिरात
मराठी बातम्या / देश / विमानतळावर CISF ने आमदाराला रोखलं, मोठी रोकड जप्त, आयकर विभाग घटनास्थळी

विमानतळावर CISF ने आमदाराला रोखलं, मोठी रोकड जप्त, आयकर विभाग घटनास्थळी

विमानतळावर CISF ने आमदाराला रोखलं, मोठी रोकड जप्त, आयकर विभाग घटनास्थळी

बिहारची राजधानी पटणामध्ये विमानतळावर सीआयएसएफने एका आमदाराला बऱ्याच पैशांसह पकडलं आहे. यानंतर पटणा विमानतळावर आयकर विभागाची टीम पोहोचली आहे.

  • -MIN READ Patna,Bihar
  • Last Updated :

पटणा, 20 सप्टेंबर : बिहारची राजधानी पटणामध्ये विमानतळावर सीआयएसएफने एका आमदाराला बऱ्याच पैशांसह पकडलं आहे. यानंतर पटणा विमानतळावर आयकर विभागाची टीम पोहोचली आहे. विमानतळाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आमदार विधानपरिषदेचा आहे. याप्रकरणी पटणा पोलिसांना माहिती देण्यात आलेली नाही. आयकर विभागाचे अधिकारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास विमानतळावर पोहोचले. हा आमदार भरपूर कॅश घेऊन विमानतळावर पोहोचणार असल्याची माहिती दिल्लीच्या आयकर विभागाला मिळाली होती. सीआयएसएफची टीमने कोणाची चौकशी सुरू आहे, हे सांगायला नकार दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमानतळावर व्हीआयपी लाऊंजमध्ये विधान परिषद आमदार दिनेश सिंग यांची आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. मंगळवारी संध्याकाळी दिनेश सिंग दिल्लीहून पटणाला परत येत होते. तपास यंत्रणांना त्यांच्या बॅगेत मोठ्या प्रमाणावर रोकड असल्याची माहिती मिळाली होती, यानंतर त्यांना विमानतळावर थांबवण्यात आलं. जेडीयूचे आमदार दिनेश सिंग लोजपा (पारस गट) च्या खासदार वीणा देवी यांचे पती आहेत. दिनेश सिंग मुजफ्फरपूर भागातले मोठे नेते समजले जातात. तब्येत खराब असल्यामुळे ते दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात दाखल होते. सोमवारी तब्येत सुधारल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सोमवारी डिस्चार्ज मिळाल्यानंतर मंगळवारी दिनेश सिंग गो एयरच्या विमानाने पटण्याला आले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात