जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / FB वर प्रेम, लग्नाचं वचन देऊन शरीर संबंध; मात्र धोका दिल्याचं कळताच प्रेयसीने दिला दुर्देवी मृत्यू

FB वर प्रेम, लग्नाचं वचन देऊन शरीर संबंध; मात्र धोका दिल्याचं कळताच प्रेयसीने दिला दुर्देवी मृत्यू

FB वर प्रेम, लग्नाचं वचन देऊन शरीर संबंध; मात्र धोका दिल्याचं कळताच प्रेयसीने दिला दुर्देवी मृत्यू

पोलीस असलेल्या या तरुणाची अत्यंत दुर्देवीपणे हत्या करण्यात आली.

  • -MIN READ
  • Last Updated :

पाटना, 5 जून : बिहारमधील (Bihar News) सीवान जिल्ह्यात मैत्री..प्रेम…फसवणूक आणि हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीवानमधील एका तरुणीचं पोलीस तरुणासोबत फेसबुकवर (facebook Friend)  मैत्री झाली आणि ही मैत्री प्रेमात बदलली. यानंतर पोलिसाने लग्नाचं आश्वासन देऊन तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले. यादरम्यान पोलिसाचं दुसरीकडे लग्न ठरलं. ज्यानंतर हताश झालेल्या तरुणीने आपल्या भावांसोबत मिळून प्रियकरची गळा चिरून हत्या केली. FB वर प्रेम, मग लग्नाचं वचन देऊन शरीरसंबंध… मिळालेल्या माहितीनुसार, दीपक नावाचा एक पोलीस कानपूरच्या बिल्होर पोलीस ठाण्यात तैनात होता. सीवानमधील एका तरुणीसोबत या पोलिसाची मैत्री झाली. हळूहळू मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि दोघं एकमेकांना भेटू लागले. तरुणी दीपकला भेटायला कानपूरला जात होती. पोलिसाने लग्नाचं वचन देऊन तरुणीसोबत शरीर संबंध ठेवले. यादरम्यान 22 एप्रिल रोजी पोलिसाचं लग्न दुसरीकडे करण्यात आलं. प्रियकराचं लग्न झाल्याचं ऐकताच तरुणीला जबर धक्का बसला. यानंतर तिने त्याच्या हत्येची योजना तयार केली. 1 जून रोजी आपल्या साथीदारांसह मिळून केली हत्या… हत्याचं कारस्थान रचल्यानंतर तरुणी 1 जून रोजी दुपारी साधारण 12 वाजता प्रियकराच्या खोलीत पोहोचली. तरुणीने आपला भाऊ आणि अन्य दोन तरुणांसोबत मिळून दीपकची गळा चिरून हत्या केली. याशिवाय त्याचा मोबाइल घेतला आणि खोलीच्या बाहेर टाळं लावून निघून गेली. या बाबत सूचना मिळताच कानपूर पोलिसांनी तपास केला. सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स तपासल्यानंतर नेमका प्रकार समोर आला. या प्रकरणात तरुणीला तिच्या भावांसह अटक करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात