नालासोपारा, 07 मार्च: मुंबईनजीक (Mumbai) असणाऱ्या नालासोपारा (Nalasopara) परिसरात एक थरारक घटना समोर आली आहे. कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केल्याच्या कारणातून येथील एका तरुणानं आपल्या भाऊजीशी सिनेस्टाईल बदला घेतला आहे. आरोपी मेहुण्यानं रविवारी रात्री दहाच्या सुमारास आपल्या भाऊजीवर गोळीबार (Gun firing at brother in law) करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे. या हल्ल्यात भाऊजी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हितेन जोशी असं हल्ला झालेल्या भाऊजीचं नाव आहे. तर दीपक गौतम असं गोळीबार करणाऱ्या मेहुण्याचं नाव आहे. जखमी हितेन जोशी रविवारी रात्री नालासोपाऱ्याच्या पूर्व संतोष भुवन परिसरातून जात होते. यावेळी पाठीमागून चालत आलेल्या दीपक आणि त्याच्या अन्य एका साथीदाराने हितेनवर गोळीबार केला. यावेळी आरोपींनी हितेनवर दोन गोळ्या झाडल्या. गोळीबार होताच हितेन रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळला. हेही वाचा- अकोल्यात अभियंत्याकडून पत्नीचा लैंगिक छळ, घटस्फोटानंतरही सुरू होता विकृत प्रकार यानंतर परिसरातील काही नागरिकांनी हितेनला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी हितेनवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. हा हल्ला केल्यानंतर आरोपी दीपक आणि त्याचा साथीदार लगेच घटनास्थळावरून फरार झाले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. हेही वाचा- एकतर्फी प्रेमातून गाठला क्रूरतेचा कळस; अल्पवयीन मुलीला पाडलं रक्ताच्या थारोळ्यात नेमकं प्रकरण काय आहे? नालासोपारा पूर्वेतील संतोष भुवन परिसराच्या शर्मावाडीमध्ये राहणाऱ्या हितेन जोशी यानं काही दिवसांपूर्वी एका मुलीशी विवाह केला होता. त्यानं मुलीच्या कुटुंबाविरोधात जाऊन हे लग्न केलं होतं. यामुळे मुलीच्या घरच्यांनी हितेनला धमकावलं होतं. आठ महिन्यांपूर्वी मुलीचा भाऊ दीपक गौतम यानं हितेनला जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली होती. यावेळी हितेन याने पोलिसात तक्रार दिली होती. यानंतर दीपकने हितेनचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. रविवारी, रात्री 10 च्या सुमारास दीपकनं संधी साधत बंदुकीतून दोन गोळ्या झाडून हितेनची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण हितेन यातून बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.