मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /प्रेम विवाहाची मोठी शिक्षा; आधी जावयाचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि...थरकाप उडवणारा प्रकार!

प्रेम विवाहाची मोठी शिक्षा; आधी जावयाचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि...थरकाप उडवणारा प्रकार!

अद्यापही आपल्या देशात प्रेम विवाह करून आनंदाने संसार करणाऱ्यांचा भयावह पद्धतीने अंत होतो. आणि हे दुर्देवी आहे.

नवी दिल्‍ली, 24 डिसेंबर : दिल्‍लीतील (Delhi Crime News) राजोरी गार्डन परिसरातील एका तरुणाचा प्रायवेट पार्ट (Genitals) कापल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी हत्या आणि अपहरण गुन्ह्याअंतर्गत तक्रार दाखल केली असून तपास सुरू केला आहे. (Love Marriage Punishment The girls relatives first beat the young man severely then cut off the private part)

गुरुवारी सफदरजंग रुग्णालयात जखमी अवस्थेत एक तरुण दाखल झाला होता. त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबीयांनी तरुणाच ही अवस्था केल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. यामुळे कुटुंबीय नाराज होते. आधी त्यांनी जावयाचं अपहरण केलं, यानंतर त्याला मारहाणही केली. यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून सागरपूर भागात फेकून फरार झाले. सध्या तरुणाला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे आणि त्याची प्रकृती नाजूक आहे. पोलीस आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करीत आहे.

जाणून घ्या काय आहे प्रकरण...

दिल्लीतील 22 वर्षीय पीडित कुटुंबासह रघुवीर नगरमध्ये राहतो. तर सागरपूरमध्ये राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीसोबत त्याचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेम सुरू होतं. इतकच नाही तर दोघांनीही लग्नासाठी दोन्ही कुटुंबाची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोणीच तयार होत नव्हतं. यानंतर तरुण-तरुणी पळून जात 21 डिसेंबर रोजी जयपूरला पोहोचले. तेथे दोघांनी एका मंदिरात लग्नही केलं. यानंतर 22 डिसेंबर रोजी दोघे दिल्लीला परतले आणि राजौरी गार्डन भागात थांबले होते. दोघेही दिल्लीला परतल्याचे कळताच तरुणीच्या कुटुंबीयांनी हा प्लान आखला.

हे ही वाचा-धक्कादायक! सोलापुरात 4 कामगारांचा ड्रेनेजमध्ये गुदमरून मृत्यू; 2 जणं जखमी

आधी केली जबर मारहाण आणि...

तरुण आणि तरुणी राजोरी गार्डनमध्ये थांबल्याचं कळताच तरुणीचे कुटुंबीय तेथे दाखल झाले. यानंतर ते दोघांनाही आपल्या सोबत सागरपूर येथे घेऊन गेले. आरोप आहे की, तरुणीच्या कुटुंबीयांनी आधी तरुणाला मारहाण केली. यानंतर दुसऱ्या ठिकाणी घेत धारदार शस्त्राने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. आणि त्याला एका जंगलात फेकून दिलं. यानंतर गुरुवारी याबाबत खुलासा झाला.

First published:

Tags: Crime news, Delhi, PRIVATE part