जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / मुलाच्या लग्नासाठी नातेवाईकांकडून पैसे घेतले अन् येताना वाटेत घडलं भयानक

मुलाच्या लग्नासाठी नातेवाईकांकडून पैसे घेतले अन् येताना वाटेत घडलं भयानक

मुलाच्या लग्नासाठी नातेवाईकांकडून पैसे घेतले अन् येताना वाटेत घडलं भयानक

राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दौसा जिल्ह्यात दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका वृद्धाचे 70 हजार रुपये चोरले

  • -MIN READ Local18 Rajasthan
  • Last Updated :

आशिषकुमार शर्मा (दौसा), 08 एप्रिल : राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दौसा जिल्ह्यात दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका वृद्धाचे 70 हजार रुपये चोरले. महवा शहरातील मंडावर रोडवर असलेल्या गोयल हॉस्पिटलजवळ ही घटना घडली.

रस्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी वृद्धाला दुचाकीवर बसवून त्यांच्या खिशातील 70 हजार चोरले. पीडितेच्या माहितीनंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. मात्र चोरट्यांचा शोध लागू शकला नाही.

जाहिरात
शिकारी स्वतःच बनला शिकार, बिबट्याला खाणाऱ्या वाघाचा Video व्हायरल

संथा येथील रहिवासी कल्याण सहाय या पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल रोजी त्यांच्या मुलाचे लग्न आहे. यासाठी त्यांनी नातेवाईकाकडून 60 हजार रुपये उसने घेतले होते. तर त्यांच्याकडे असलेले 10 हजार असे 70 हजार रुपये होते. दरम्यान बाजारातून लग्नाचे साहित्य घेण्यासाठी आले होते.

यादरम्यान शहरातील मंडावर रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्याजवळ थांबून आपल्याला हिंडौनकडे जायचे आहे, कोणत्या मार्गाने जावे, असे विचारलं. यावेळी तो वृद्ध व्यक्ती म्हणाला मीही तिकडे जात आहे. मला सोडा मी तुम्हाला वाट दाखवतो असे म्हणाला. यादरम्यान चोरट्यांनी वाटेत वृद्धाच्या खिशातील 70 हजार रुपये घेऊन वृद्धाला हिंडौन रस्त्यावर सोडून पळ काढला.

पती कामासाठी परदेशात, पत्नीने 3 कोटींची लॉटरी जिंकली अन् थाटला दुसरा संसार
जाहिरात

पीडितेच्या माहितीनंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. मात्र चोरट्यांचा शोध लागू शकला नाही. याप्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेपूर्वी पीडित एका नातेवाईकाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेला होता, त्यानंतर तो बाजारात खरेदीसाठी जात होता, त्याच दरम्यान ही घटना घडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात