गोरखपुर, 4 जानेवारी : लिव्ह इनच्या माध्यमातून गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धककादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय आल्याने लिव्ह इन पार्टनरने तिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना यूपीमधील गोरखपूर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात तरुणीच्या हत्येचे गूढ उकलले आहे. लिव्ह इन पार्टनर म्हणजेच तरुणीच्या प्रियकरानेच मुलीच्या हत्येची घटना घडवली. प्रियकराला तरुणीच्या चारित्र्यावर संशय यायचा, अशा परिस्थितीत त्याने 31 डिसेंबरला त्याने तिची हत्या केली. आरोपी प्रियकराने तरुणीचा गळा दाबून खून केला. बेलीपार पोलिसांनी हत्येचा आरोपी मारुती नंदन या तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणाचा खुलासा करताना एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर म्हणाले की, 31 डिसेंबर रोजी बेलीपार पोलिसांना काकराखोर परिसरात एका मुलीचा अज्ञात मृतदेह सापडला होता. अशा परिस्थितीत मुलीच्या मृतदेहाची ओळख पटवण्याबरोबरच पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले. पोलिसांना मृत तरुणीकडून रेल्वे पास मिळाला होता, त्या आधारे बेलीपार पोलिसांनी रेल्वे कॉलनी, मुगलसराय जिल्हा, चंदौली येथील रहिवासी रामरतनच्या घरी धाव घेतली. धक्कादायक खुलासा - फोटोच्या माध्यमातून रामरतनने मुलीला ओळखले आणि ती आपली मुलगी सरिता मौर्या असल्याचे सांगितले. मृत सरिताच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी चार वर्षांपासून घर सोडून गेली होती. त्याचवेळी, एसएसपीने खुलासा करताना सांगितले की, नर्सिंगची विद्यार्थिनी सरिता मौर्य आणि बेलीपार पोलीस स्टेशन हद्दीतील वरबासपूर भागातील मारुती नंदन यांची 2018 साली फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि यानंतर दोघेही वाराणसीमध्ये भाड्याने घर घेऊन राहू लागले. मात्र, नंतर सरिता दुसऱ्या कोणाशी तरी बोलते, असे मारुती नंदन या तरुणाला वाटले. त्यामुळे दोघांमध्ये भांडण व्हायचे. हेही वाचा - ..म्हणे अंगात दैवी शक्ती, महिलेसोबत वारंवार ठेवले शरीर संबंध पुढे मारुती नंदन आणि सरिता लखनौमध्ये राहू लागले, पण तरीही त्यांच्या नात्यातील कटुता कमी झाली नाही. एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर यांनी खुलासा करताना सांगितले की, आरोपी प्रियकर मारुती नंदन याने आपल्या प्रेयसीच्या हत्येचा कट रचत 31 डिसेंबरला प्रेयसी सरिता मौर्याला लखनऊहून गोरखपूरला बोलावले होते. गोरखपूरला आल्यावर तो उन्वाल आणि महादेवा परिसरात दुचाकीवरून तिला फिरवत राहिला. यानंतर रात्रीच्या वेळी त्याने तिला वेलीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काकराखोर परिसरात निर्जनस्थळी आणले आणि जखमी करून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. या घटनेनंतर लिव्ह इनला आणखी एक तरुणी बळी पडल्याची घटना समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.