मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'काय रे काय करताय? थांबा', पोलिसांचा आवाज ऐकताच ठोकली धूम, मध्यरात्रीच्या गस्तीत उतरली मोटारसायकल चोरांची मस्ती

'काय रे काय करताय? थांबा', पोलिसांचा आवाज ऐकताच ठोकली धूम, मध्यरात्रीच्या गस्तीत उतरली मोटारसायकल चोरांची मस्ती

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

लातूर शहरात पोलिसांना दोन कुख्यात दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकण्यात यश आलं आहे.

लातूर, 14 ऑगस्ट : राज्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या चोरट्यांना बेड्या ठोकण्याचे पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. विशेष म्हणजे लातूर शहरात पोलिसांना दोन कुख्यात दुचाकी चोरट्यांना बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. पोलीस रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना आरोपी चोरटे हे त्यांच्या जाळ्यात सापडले आहेत. खरंतर पोलीस हे त्या चोरट्यांना पकडण्याच्या उद्देशाने संबंधित परिसरात गेले नव्हते. पण रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना त्यांना काही गोष्टी संशयित वाटल्या. त्यानंतर आरोपी पळू लागले. अखेर त्यांचा पाठलाग करत पोलिसांनी चोरट्यांना बेड्या ठोकल्या. लातूर शहरात मध्यरात्री पेट्रोलिंग दरम्यान विशेष पथकास दोन इसम एका मोटरसायकलवर शाहू चौक परिसरात संशयितरित्या फिरताना आढळून आले. पथकातील पोलिसांनी मोटरसायकलस्वारांना थांबण्याचा इशारा केला. पण त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विशेष पथकातील पोलिसांनी पाठलाग करून पळून जाणाऱ्या संशयित इसमाला रिंग रोड जवळील गुळ मार्केट परिसरात ताब्यात घेतले. (मुलीला फूस लावून पळवून नेलं, कोर्टाकडून अद्दल घडवणारी शिक्षा, भंडारा जिल्हा कोर्टाचा मोठा निर्णय) पोलिसांनी आरोपींची विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव शुभम उर्फ सुग्रीव जरीचंद कुंभकर्ण असं सांगितलं. शुभम हा राहणार उस्मानाबाद जिल्ह्यातील घारगावचा रहिवासी आहे. तर दुसऱ्या आरोपीचं नाव गोपाळ सखाराम माने असं आहे. तो बीड जिल्ह्यातील रुई धारूर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल काही दिवसांपूर्वीच चोरी केल्याचे कबुल केलं. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर या चोरांनी लातूर शहरातील पोलीस ठाणे शिवाजीनगर, एमआयडीसी, गांधी चौक तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस ठाणे आनंदनगर, पोलीस ठाणे फौजदार चावडी, सोलापूर येथील विविध ठिकाणाहून चोरी केल्याचे देखील कबूल केले. पोलिसांनी एकूण 13 मोटरसायकली आरोपींच्या ताब्यातून जप्त केल्या आहेत.
First published:

Tags: Crime, Latur

पुढील बातम्या