मुंबई, 06 जून: मुंबई (Mumbai Rain) त रात्रभर पावसानं हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरात मान्सून पूर्व पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची थोडी फार उकाड्यापासून सुटका झाली आहे. कालच भारतीय हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेनं राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. राज्यात कालच मान्सून दाखल झाला. एएनआय या वृत्तसंस्थेनं दादर परिसरातील पावसाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात जोरदार पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. मध्यरात्रीपासून सुरु झालेला पाऊस पहाटेपर्यंत बरसत होता.
#WATCH | Maharashtra: Rain lashes parts of Mumbai; visuals from Dadar pic.twitter.com/Aubvh5XgyN
— ANI (@ANI) June 5, 2021
महाराष्ट्रात मान्सून दाखल दक्षिणेकडील हवेच्या चक्रीय स्थितीमुळे मागील आठवड्यात श्रीलंकेच्या आसपास मान्सूनचा (Monsoon) वेग मंदावला होता. त्यामुळे केरळात मान्सून (Monsoon in kerala) दाखल व्हायला तीन दिवस विलंब झाला. पण त्यानंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वेग पकडला असून अवघ्या दोन दिवसांत मान्सून केरळातून महाराष्ट्रात धडकला आहे. हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजापेक्षा दोन दिवस आधीच मान्सूनने महाराष्ट्रात एन्ट्री (Monsoon arrive in Maharashtra) केली आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून टाकणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी रत्नागिरी जिल्ह्याच्या हर्णे याठिकाणी मान्सूनने आगमन केलं आहे. यानंतर मान्सून दक्षिण मध्य महाराष्ट्रासह सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागाला मान्सून व्यापून टाकणार असल्याची सुधारित माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. तर 11 ते 15 जून दरम्यान पुणे आणि मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईकरांना मान्सूनच्या पहिल्या पावसाच्या आनंदासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.