शिर्डी, 13 मार्च: गेल्या सहा महिन्यांपासून शिर्डी जवळच्या कोपरगाव परिसरात चोऱ्या (Kopargaon theft Crime) करून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Police Arrest) आहे. विशेष म्हणजे हा भामटा चोऱ्या करण्यासाठी चक्क साडी (Accused Wear saree While theft) नेसायचा. त्यामुळेच गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देण्यात त्याला यश येत होतं. पण अलीकडेच साडी नेसून चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या फुटेजच्या मदतीनं पोलिसांनी आरोपीला अवघ्या काही तासातच बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी चोरट्याचं नाव संजय पाटील असून तो जळगाव जिल्ह्यातील शिवाजीनगर येथील रहिवासी आहे. त्याने गेल्या काही काळापासून शिर्डी जवळच्या कोपरगाव परिसरात चोऱ्या करत अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तो परिसरातील विविध दुकांनातून सामान आणि रोख रकमेची चोरी करत असत. विशेष म्हणजे हा भामटा साडी नेसून या चोऱ्या करायचा. त्यामुळे त्याचा कोणालाही थांगपत्ता लागत नव्हता. तसेच तो दुकानात प्रवेश करण्यासाठी उंच असलेल्या जाळीवरही सहजतेनं चढायचा. अशा या अट्टल चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे परिसरातील दुकानदारांनी आणि व्यावसायिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
खरंतर, गेल्या काही काळापासून कोपरगाव भागात चोरीचे प्रमाण वाढले होते, त्यामुळे पोलीस चोराच्या मागावर होते. पण चोरटा काही पोलीसांच्या जाळ्यात अडकत नव्हता. पण त्याने अलीकडेच चंद्रहास या पैठणीच्या दुकानात चोरी केली. यावेळी चोरी करतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. पण भामट्याने अंगावर साडी नेसल्यानं त्याची ओळख पटवणं पोलिसांना अवघड जात होतं.
हे ही वाचा-सुरक्षा रक्षकानेच मारला डल्ला; कंपनीत 1 कोटी 44 लाख रुपयांची चोरी करुन झाला फरार
पण कोपरगाव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोराची उंची आणि शरीराच्या हालचालींच योग्य निरीक्षण केलं. याच निरीक्षणांच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपी संजय पाटील याने चोरीची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shirdi news, Theft