Home /News /news /

सुरक्षा रक्षकानेच मारला डल्ला; कंपनीत 1 कोटी 44 लाख रुपयांची चोरी करुन झाला फरार

सुरक्षा रक्षकानेच मारला डल्ला; कंपनीत 1 कोटी 44 लाख रुपयांची चोरी करुन झाला फरार

एका खाजगी कंपनीत तब्बल 1 कोटी 44 लाख रुपये चोरल्याची (Theft 1 Crore 44 Lakh) धक्कादायक घटना समोर आली होती. याबाबतचं गुढ पोलिसांनी उलगडलं असून आरोपीला अटक केली आहे.

    बद्दी, 13 मार्च: एका सिक्युरीटी गार्डने  (Security Guard) ज्याठिकाणी काम करत होता, त्याच खाजगी कंपनीत तब्बल 1 कोटी 44 लाख रुपये चोरल्याची (Theft 1 Crore 44 Lakh) धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी सिक्युरिटी गार्ड चोरीच्या घटनेनंतर अचानक गायब झाला होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी बराच तपास केला, तरीही आरोपीला अटक (Accused arrested) करण्यात पोलिसांना यश येत नव्हतं, पण काल शुक्रवारी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्याच्या बद्दी येथील आहे. येथील एका खाजगी कंपनीत तब्बल 1 कोटी 44 लाख रुपयांची चोरी झाली होती. पण चोरी नेमकी कोणी केली, हे एक कोड उलगडत नव्हतं. पण पोलिसांनी तपास करत अखेर हे रहस्य उलगडलं आहे. तसंच पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला चंबा येथून अटक केली आहे. आरोपी गेल्या काही काळापासून फरार होता. सिक्युरिटी गॉर्डला ठोकल्या बेड्या - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होता. कंपनीत 1 कोटी 44 लाख रुपयांवर डल्ला मारल्यानंतर आरोपी फरार होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी अनेकदा चंबा याठिकाणी छापा टाकला होता, पण आरोपीने प्रत्येक वेळी पोलिसांना गुंगारा दिला होता. त्यानंतर बद्दी पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी पुन्हा चंबा याठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. (वाचा - फेसबुकवरील मैत्री पडली महागात, तरुणीनं घातला दहा लाखाचा गंडा) पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर, त्याला बद्दी याठिकाणी आणण्यात आलं. याबाबत माहिती देताना बद्दीचे एसपी रोहित मालपानी यांनी सांगितलं की, आरोपीला नालागड न्यायालयात हजर केलं जाईल. त्यानंतर पोलीस आरोपीला रिमांडवर घेतील. पोलीस कोठडीतील चौकशी दरम्यान संबंधित चोरीच्या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची अपेक्षा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Himachal pradesh, Theft

    पुढील बातम्या