मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /खून प्रकरणात भाजपच्या तालुकाध्यक्षाला बेड्या; उपसरपंचपदाच्या निवडणुकीत झाली होती हत्या

खून प्रकरणात भाजपच्या तालुकाध्यक्षाला बेड्या; उपसरपंचपदाच्या निवडणुकीत झाली होती हत्या

बोरगावच्या उपसरपंच पदाच्या निवडीवेळी एका ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग जनार्दन काळे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी भाजपचे कवठे महांकाळ तालुकाध्यक्ष (Kavathe Mahakal Taluka President BJP) जनार्दन एकनाथ पाटील यांना बेड्या ठोकल्या आहेत.

पुढे वाचा ...

कवठे महांकाळ, 16 मार्च: काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील बोरगाव याठिकाणी उपसरपंच पदाच्या निवडीवेळी एक ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग जनार्दन काळे यांचा निर्घृण खून (Gram panchayat member murder Case) करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी कवठे महांकाळ पोलिसांनी कारवाई करत आतापर्यंत 14 जणांना बेड्या ठोकल्या आहेत, तर 25 जण अद्याप फरार आहेत. या हत्येप्रकरणी पोलिसांनी भाजपचे कवठे महांकाळ तालुकाध्यक्ष (Kavathe Mahakal Taluka President BJP) जनार्दन एकनाथ पाटील (Janardhan Eknath Patil) यांना बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पोलीस जनार्दन पाटील यांची चौकशी करत असून लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येथील उपसरपंच पदाच्या निवडीच्या वेळी वाद होऊन ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग जनार्दन काळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी मृत पांडूरंग काळे यांचा भाऊ अंकुश जनार्दन काळे यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात तब्बल 39 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बरेच आरोपी फरार झाले होते. हत्येच्या घटनेला 10 दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांनी केवळ 14 जणांना अटक केली आहे. तर 25 आरोपी अद्याप फरार आहेत, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गेल्या दहा दिवसांत आरोपींनी पोलिसांना अनेकदा गुंगारा दिला आहे.

(वाचा -मुंबई हादरली! मैत्री तोडली म्हणून तरुणाने युवतीसह तिच्या आईवर चाकूने केले वार)

आता कवठे महांकाळ पोलिसांनी धडक कारवाई करत भाजपचे कवठे महांकाळ तालुकाध्यक्ष जनार्दन एकनाथ पाटील यांना अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत माजी सरपंच नितीन पाटील, माजी उपसरपंच नामदेव पाटील, सदस्य सुजित पाटील, नंदकुमार पाटील यांच्यासह नऊ जणांना अटक केली होती. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून इतर 30 संशयितांनी पोलिसांना गुंगारा दिला होता. सोमवारी आणखी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये भाजप तालुका अध्यक्ष जनार्दन एकनाथ पाटील, प्रविण जनार्दन पाटील, संतोष शंकर पाटील, युवराज आनंदराव पाटील आणि अनिल ज्ञानू शिंदे यांचा समावेश आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Murder