मुंबई 13 ऑक्टोबर : करवा चौथ आता देशभरातात साजरा केला जातो. उत्तर भारतात या दिवसाला जास्त महत्व आहे. या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. या दिवशी महिला नवीन कपडे घालतात. तसेच पार्लरमध्ये देखील जातात. त्यांची ही तयारी खरंतर अनेक दिवसांपूर्वीपासून सुरु असते. ज्यासाठी वेगळी शॉपिंग देखील केली जाते.
खरंतर या संदर्भात नोएडामधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. येथे एका व्यक्तीने करवा चौथला सजवलेल्या थाळ्या चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी याप्रकरणी एका चोरट्याला अटक केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीतील मंडवली येथे राहणारा नरेश कुमार नावाचा व्यक्ती नोएडातील सदर बाजार येथे गेला होता. तेथून त्यांनी करवा चौथच्या 20 सजवलेल्या थाल्या विकत घेतल्या आणि त्या थाल्या पार्किंगमध्ये ठेवल्या.
परंतू तिथून त्या थाली कोणीतरी चोरल्या. त्यानंतर तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि मग पार्किंगमधील सीसीटीव्ही तपासले
यानंतर नरेश यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती करवा चौथच्या या प्लेट्स चोरत असल्याचे आढळून आले. यानंतर, याप्रकरणी तातडीने कारवाई करत दिल्ली पोलिसांनी नोएडास्थित किराणा दुकान मालकाला अटक केली आहे. 28 वर्षीय नवनीत कुमार असे आरोपीचे नाव आहे.
चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याचे नोएडा येथे किराणा दुकान आहे आणि तो सदर मार्केटमधून सामान घेण्यासाठी आला होता. सजावटीच्या करवा चौथ भेटवस्तूंनी भरलेली बेवारस पोती त्याने पडलेली पाहिली. त्याला वाटलं कोणीतरी तेथे विसरुन गेलं असावं. त्याने पोतीत पाहिलं तेव्हा त्याला सुंदर थाल्या दिसल्या, म्हणून मग शेवटी त्याने ती घरी घेऊन जाण्याचा विचार केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Shocking news, Theft, Viral