नालासोपारा, 23 फेब्रुवारी : सोनं (Gold) खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार सराफ वेगवेगळे दागदागिने (Gold ornaments) दाखवत असतात. अशाच प्रकारे नालासोपारा येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये (Jewellery Shop in Nalasopara) एक तरुण सोन्याची चैन खरेदी करण्यासाठी आला. त्यानेही सराफाकडे वेगवेगळ्या चैन दाखवण्याची मागणी केली. यानंतर संधी साधून या तरुणाने तीन चैन घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Theft in Nalasopara Jewellery Shop, incident caught in CCTV) घटना सीसीटीव्हीत कैद नालासोपारा पूर्वेकडील विजय नगर येथे उत्तम ज्वेलर्समध्ये ही घटना घडली आहे. ज्वेलरी शॉपमध्ये ग्राहक बनून आलेल्या आरोपीने आपल्याला सोन्याची चैन खरेदी करायचं असल्याचं सांगितलं. यावेळी सराफाने त्या ग्राहकाला त्याचं बजेट विचारलं. 40 ते 50 हजारापर्यंत आपलं बजेट असून त्यानुसार चैन दाखवा असं ग्राहकाने सराफाला सांगितले.
सराफाने ग्राहकाच्या बजेटनुसार चैन दाखवण्यास सुरुवात केली. प्रथम दाखविलेल्या चैन आपल्याला पसंत नसल्याचं सांगत ग्राहकाने दुसऱ्या चैन दाखवण्याची मागणी केली. यावेळी सराफाने त्या ग्राहकाला आणखी चैन दाखवल्या. त्यानंतर संधी साधून आरोपी तरुणाने तीन चैन घेऊन ज्वेलरी शॉपमधून पलायन केलं. वाचा : अल्पवयीन आते बहिणीवर मामेभावाने केला अत्याचार, पीडित 3 महिन्याची राहिली गरोदर ज्वेलरी शॉपमध्ये आलेल्या या तरुणाचं कृत्य ज्वेलरी शॉपमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आरोपीने टोपी घातली असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. सराफाने सांगितल्यानुसार, आरोपीसोबत आणखी एक व्यक्ती होता आणि तो व्यक्ती ज्वेलरी शॉपच्या बाहेर उभा होता. तीन चैन घेऊन आरोपीने ज्वेलरी शॉपच्या बाहेर पलायन केलं आणि त्याच्यासोबतच ज्वेलरी शॉपबाहेर उभ्या असलेल्या दुसऱ्या आरोपीनेही पोबारा केला. वाचा : स्मशानातून बाहेर पडले अन् टोळीने 2 भावांवर केले तलवारीने सपासप वार, उल्हासनगर हादरलं ज्वेलरी शॉप चालकाने सांगितले की, आपल्या दुकानातून एकूण तीन चैन घेऊन आरोपीने पलायन केलं. या तिन्ही चैनची एकत्रित किंमत अंदाजे 82 हजारांच्या आसपास असल्याची माहिती ज्वेलरी शॉप चालकाने दिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 22 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी साधारणत: साडे सहा वाजण्याच्या सुमारास हा आरोपी तरुण ज्वेलरी शॉपमध्ये आला होता. सोन्याची चैन खरेदी करण्याच्या बहाण्याने तो आला आणि तीन चैन घेऊन पोबारा केला.