मुंबई, 18 फेब्रुवारी : मुंबईत एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे मुंबई पोलिसांना थेट आव्हानच निर्माण झाले आहे. मुंबईतील काळाचौकी पोलीस स्टेशन हद्दीत एक दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी अशा पद्धतीने चोरी केली आहे ज्यामुळे मुंबई पोलिसांना या दरोडेखोरांना शोधने म्हणजे एक मोठं आव्हान होवून बसले आहे. काळाचौकी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबेवाडी येथील मंगल ज्वेलर्सवर दरोड्यांनी दरोडा टाकला. या दरोड्यात दरोडेखोरांनी तब्बल २ कोटी ८२ लाख रुपयांचे १५ प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले आहे आणि जाता जाता त्यांनी मागे एकही पुरावा सोडला नाही. दरोडेखोर इतके सराईत होते की, त्यांनी दरोडा टाकण्याआघी मंगल ज्वेलर्सची रेकी केली. कोणत्या वेळेस या ज्वेलर्सच्या बाहेर गर्दी नसते लोकांची ये जा नसते, मध्यरात्री कोणत्या वेळेस मंगल ज्वेलर्स परीसर निर्मनुष्य असतो. मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी मंगल ज्वेलर्सच्या बाहेरील BEST च्या स्ट्रीट पोलवरील लाईटची वीज कट केली आणि कटरच्या साह्यायाने शेटरचे लाॅक तोडून दरोडेखोर आत शिरले. दुकानातील सर्व दागिन्यांवर हात साफ करुन जाता जाता या दरोडेखोरांनी आपली चोरी पकडली जाऊ नये याकरता दुकानातील सीसीटीव्ही फुटेज साठवले जाते ती DVR मशीनच चोरांनी चोरुन नेली. त्यामुळे नेमक्या किती जणांनी ज्वेलर्सवर दरोडा टाकला, कोणी नेमके काय केले याबाबत पोलिसांना काहीच सुगावा लागत नाही, अशी माहिती काळाचौकी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळसिंग पाटील यांनी दिली. खरंतर अशा प्रकारे ज्वेलर्सवर दरोड्याच्या घटना मुंबईत काही नवीन नाही पण, ज्वेलर्स मालक जी काळजी घेतात. ती काळजी या ज्वेलर्स मालकाने घेतली असती तर या ज्वेलर्स दुकानावर पडलेला दरोडा टाळता आला असता. कारण ज्वेलर्स मालकाने दुकानाच्या लाॅकला किंवा आजूबाजूला थेफ्ट अलार्म लावला नव्हता, ज्वेलर्स दुकानात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे थर्मल कॅमेरे नव्हते आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे, सीसीटीव्ही कॅमेरे मोबाईलशी कनेक्ट नव्हते. तसंच DVR मशीन व्यतिरिक्त क्लाऊडबेसमध्ये सीसीटीव्ही फुटेज सेव्ह करण्याचे ॲापशन ज्वेलर्स मालकाने ठेवले नव्हते. ज्वेलर्स मालकाच्या या सर्व चुकांचा फायदा दरोडेखोरांनी घेतला आणि तब्बल 2 कोटी 82 लाख रुपयांचे दागिने लंपास केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.