जालन : शेतात कापूस गोळा करणाऱ्या महिलेवर चाकूच्या धाकाने दोन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देऊन हा बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे जालनामध्ये खळबळ उडाली आहे. गळ्याला चाकू लावून महिलेवर दोन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातील वाटूर फाटा तांडा येथे घडली आहे. गावातील एक 26 वर्षीय महिला तिच्या स्वतःच्या शेतात 25 मार्च रोजी दुपारी 1 वाजता काम करत असताना हा प्रकार घडला.
वृद्धाने धारदार शस्त्राने कापले गुप्तांग, असं काय घडलं? धक्कादाक कारण समोरगावातीलच नामे वकील दासू आढे हा इसम पाणी पिण्याच्या बहाण्याने तिथे आला. त्याने त्या महिलेच्या गळ्यावर चाकू लावून तुला मारुन टाकतो अशी धमकी देऊन, बळजबरीने बलात्कार केला.
पुन्हा ही महिला 1 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेदरम्यान शेतात कापूस वेचत असतांना वकील आढे हा नराधम तिथे आला आणि पुन्हा धमकी देऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी दरम्यान याप्रकरणी परतूर पोलिसांनी आरोपी वकील आढे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.