जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / भयंकर! अल्पवयीन तरुणांचे 6 वर्षीय चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार; VIDEO पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का

भयंकर! अल्पवयीन तरुणांचे 6 वर्षीय चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार; VIDEO पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का

Representative Image

Representative Image

जळगाव (Jalgaon Crime Update) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. लहान मुलांच्या निरागसतेला काळीमा फासणारी घटना याठिकाणी घडली आहे. कारण यात आरोपही अल्पवयीन असून ज्या मुलावर अत्याचार झाला होता अवघ्या सहा वर्षांचा असल्याची माहिती समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नितीन नंदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 01 एप्रिल: जळगाव (Jalgaon Crime Update) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. लहान मुलांच्या निरागसतेला काळीमा फासणारी घटना याठिकाणी घडली आहे. कारण यात आरोपीही अल्पवयीन असून ज्या मुलावर अत्याचार झाला होता तो अवघ्या सहा वर्षांचा असल्याची माहिती समोर आली आहे. पारोळा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सहा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचे आरोप या अल्पवयीन मुलांवर आहेत. या प्रकाराचे व्हिडीओ चित्रीकरण समोर आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत दोन अल्पवयीन मुलांवर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा तालुक्यातील ज्या गावात ही घटना घडली त्याच ठिकाणी हा 6 वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गावातीलच एका मंदिरात हा चिमुरडा दर्शनासाठी गेला होता. त्यासोबत एक 15 वर्षीय आणि दुसरा 16 वर्षीय अशी दोन मुलं देखील होती. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे या दोन्ही अल्पवयीन मुलांनी सहा वर्षाच्या मुलावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. 26 मार्च रोजी ही घटना घडली. माहितीनुसार, या चिमुरड्यासह ही गंभीर घटना घडत होती तेव्हा एका तरुणानेच घडल्या प्रकाराचा व्हिडीओ शूट केला होता. त्याने घाबरुन तो व्हिडीओ 29 मार्च रोजी सकाळी त्या मुलाच्या एका जवळच्या नातेवाईकाला दाखवला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. हे वाचा- रानुडक्कराच्या शिकाराची किंमत जीव गमावून चुकवली! कारवाई होताच आरोपीनं उचललं धक्कादायक पाऊल हा रेकॉर्ड केलेला व्हिडीओ जेव्हा मुलाच्या कुटुंबीयांनी बघितला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. आपल्या मुलासह घडलेला प्रकार पाहून त्यांना धक्काच बसला आणि लगेचच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या दोन्ही अल्पवयीन मुलांच्या विरोधात पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात