नीमच, 22 मे : मध्यप्रदेशातील नीमच
(Neemuch MP) येथून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करुन त्याची हत्या
(Old Man Murder) करण्यात आली आहे. या हत्येचे कारण वाचून तुम्हाला संताप येईल, असे आहे. या हत्येचा आरोप एका भाजप नेत्यावर आहे. तर या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर
(Social Media Video Viral) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं -
मुस्लिम असण्याच्या संशयावरुन एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात करुन त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेसंदर्भात व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे की, आरोपी एका वृद्धाला मारताना दिसत
(Old Man Beating by Bjp Leader) आहे. तसेच आधार कार्ड दाखव, असे सांगत आहे. हत्या
(Old man Murder) करण्यात आलेल्या या वृद्धाचे नाव भंवरलाल जैन असे आहे. ते रतलाम जिल्ह्यातील रहिवासी होते.
रतलाम जिल्ह्यातील एक कुटुंब 15 मे रोजी राजस्थानमधील चित्तोडगड
(Chittorgarh Rajasthan) येथील किल्ल्यावर भेरूजीची पूजा करण्यासाठी गेले होते. दरम्यान, भंवरलाल जैन हे दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांना न सांगता गायब झाले. बराच शोध घेऊनही ते सापडले नाहीत. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी चित्तौडगड पोलीस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार दाखल केली.
याचदरम्यान, गुरुवारी मनसा (नीमच) येथील रामपुरा रोडवर असलेल्या मारुती शोरूमजवळ एका वृद्धाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटवली असता हा मृतदेह 65 वर्षांच्या भंवरलाल जैन यांचा असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी मृताचा फोटो काढून सोशल मीडियावर टाकला. घटनेची माहिती मिळताच मृताच्या परिवारातील सदस्य याठिकाणी आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
अशी आली घटना समोर -
या वृद्ध व्यक्तीची हत्या झाली आहे हे त्यांच्यावर अंतिम संस्कार झाल्यानंतर समोर आले आहे. मृत व्यक्ती यांचे भाऊ राकेश जैन यांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. यात एक व्यक्ति भंवरलाल जैन यांना कानशिलात लगावताना दिसला. तसेच या व्हिडिओत ऐकू येत आहे की, "काय तुझे नाव मोहम्मद आहे?, जावरा येथून आला आहेस?, चल तुझे आधार कार्ड दाखव..." तेच मार खाणारा हा व्यक्ती 200 रुपये घ्या, असे सांगताना अत्यंत दयनीय अवस्थेत दिसत आहे.
आरोपीची पत्नी होती भाजप नगरसेविका -
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकच खळबळ उडाली. राकेश जैन यांनी मोठ्या प्रमाणात लोकांना घेऊन मनासा पोलीस ठाणे गाठले. तसेच आरोपीला अटक करुन त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी व्हिडिओ तपासला. तसेच मारहाण करणाऱ्या व्यक्तीचीही ओळख पटवली आहे. या प्रकरणातील आरोपी हा भाजप नेता असल्याचे समोर आले आहे. आरोपीचे नाव दिनेश कुशवाह असे आहे. तसेच त्याची पत्नी भाजपच्या नगरसेवक होत्या.
हेही वाचा - घरातच संपवलं आयुष्य, आईसह दोन लेकींची आत्महत्या, खोलीत सापडली सुसाईड नोट
आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणात आयपीसी कलम 304/2 आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मनासा पोलीस ठाण्याचे अधिकारी केएल दांगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणाचा तपासा सुरू झाला आहे. याप्रकरणी आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्याविरोधातही कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.