जाहिरात
मराठी बातम्या / देश / घरातच संपवलं आयुष्य, आईसह दोन लेकींची आत्महत्या, खोलीत सापडली सुसाईड नोट

घरातच संपवलं आयुष्य, आईसह दोन लेकींची आत्महत्या, खोलीत सापडली सुसाईड नोट

घरातच संपवलं आयुष्य, आईसह दोन लेकींची आत्महत्या, खोलीत सापडली सुसाईड नोट

आई आणि दोन मुलींनी फ्लॅटला चारही बाजूंनी कुलूप लावले होते. आत्महत्येमागील कारण जाणून घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 मे: दक्षिण-पश्चिम दिल्लीतील पॉश भागात असलेल्या वसंत विहार (Vasant Vihar) मध्ये शनिवारी रात्री एकाच कुटुंबातील (Family Committed Suicide) 3 जणांनी आत्महत्या केली. आई आणि दोन मुलींनी फ्लॅटला चारही बाजूंनी कुलूप लावले होते आणि त्यात काही रासायनिक पदार्थ टाकलं. प्राथमिक तपासात तिघीचाही मृत्यू गुदमरल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी कुटुंबप्रमुखाचा कोरोनाने मृत्यू झाला होता, तेव्हापासून संपूर्ण कुटुंब नैराश्यात होते. आत्महत्येमागील कारण जाणून घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. मंजू (50), तिच्या मुली अंशिका (30) आणि अंकू (30) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत विहार पोलीस स्टेशनला रात्री 9 वाजताच्या सुमारास पीसीआर मार्फत माहिती मिळाली की वसंत अपार्टमेंटमध्ये असलेल्या फ्लॅट क्रमांक 207 मध्ये काही लोकांनी स्वतःला कोंडून घेतले आहे.

जाहिरात

खोलीत सुसाईड नोट सापडली माहिती मिळताच घटनास्थळी टीमसोबत पोहोचलेल्या एसएचओला सर्व खिडक्या आणि दरवाजे आतून चारही बाजूंनी बंद दिसले. कसेबसे उघडले असता खोलीत अर्धा उघडा एलपीजी सिलेंडर आणि काही सुसाईड नोट पडलेल्या आढळून आल्या. आतील खोल्यांची झडती घेतल्यावर बेडवर तीन मृतदेह आढळून आले आणि खोलीत तीन अग्निशामक यंत्रेही ठेवण्यात आली होती. तिघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वी, घराचा मालक आणि मंजूच्या पतीचा एप्रिल 2021 मध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला होता. यानंतरच संपूर्ण कुटुंब नैराश्याचे बळी ठरले आणि मंजू सतत आजारी पडू लागली. अंशिका आणि अंकु या दोन्ही मुलीही कुणाच्या संपर्कात नव्हत्या. पोलीस मुख्य दरवाजातून गेले आत अधिक माहिती देताना पोलीस उपायुक्त (दक्षिण-पश्चिम) मनोज सी म्हणाले की, रात्री 8:55 वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की एका घरातील रहिवासी दरवाजा उघडत नाहीत आणि ते आतून बंद आहे. खोलीचा दरवाजा ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पोलिसांनी मुख्य दरवाजातून खोलीत प्रवेश केला.प्रकरणाचा प्रत्येक पैलू तपासत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: delhi , sucide
  • First Published :
जाहिरात
जाहिरात