मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पोलिसांची गुंडगिरी! नाकाखाली मास्क घसरल्यानं रिक्षा चालकाला अमानुष मारहाण; पाहा VIDEO

पोलिसांची गुंडगिरी! नाकाखाली मास्क घसरल्यानं रिक्षा चालकाला अमानुष मारहाण; पाहा VIDEO

रिक्षा चालकाचा मास्क नाकाखाली आल्यानं (rickshaw driver mask slipped) दोन पोलिसांनी चालकाला बेदम मारहाण (police beat rickshaw driver) केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

इंदोर, 07 एप्रिल: सध्या देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona Pandemic) वेगाने वाढत आहे. अशातचं सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना कोरोना विषाणूचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. अशातचं एका रिक्षा चालकाचा मास्क नाकाखाली आल्यानं (rickshaw driver mask slipped) दोन पोलिसांनी रिक्षा चालकाला बेदम मारहाण (police beat rickshaw driver) केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर वेगात व्हायरल होत असून पोलिसांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

संबंधित मारहाणीची घटना इंदोर शहरातील परदेशीपुरा भागात घडली आहे. येथील रिक्षा चालक कृष्णा कंजीर यांचा मास्क नाकाच्या खाली घसरला होता. दरम्यान नाकाच्या खाली घसरलेला मास्क पोलिसांनी पाहिला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अडवून पोलीस स्थानकात येण्यास सांगितलं, पण रिक्षा चालकानं याला नकार दिला. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यानं दंडेलशाहीचा अवलंब करत रिक्षाचालकाची पँट पाठीमागून पकडली. रिक्षा चालकालाही राग अनावर झाल्यानं त्याने पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडली. यातून वाद वाढत गेला. त्यामुळे दोन्ही पोलिसांनी संबंधित रिक्षाचालकाला भर उन्हात रस्त्यावर पाडून मारहाण केली आहे.

या व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, दोन पोलीस कर्मचारी एका रिक्षा चालकाला रस्त्यावर खाली पाडून मारहाण करत आहेत. पोलिसांनी पीडित रिक्षा चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. कमल प्रजापती आणि धर्मेंद्र जाट अशी या दोन पोलिसांची नावं असून त्यांना इंदोरचे एसपी आशुतोष बागरी यांनी निलंबित केलं आहे.

" isDesktop="true" id="537947" >

हे ही वाचा- आता काय कार चालवतानाही हेल्मेट वापरायचं का? वाहन चालकाला द्यावा लागला दंड

संबंधित पोलीस कर्मचारी रिक्षा चालकाला मारहाण करत असताना, पीडिताचा अल्पवयीन मुलगा, भावजय आणि बहिणही त्याला माफ करण्याची मागणी करत होते. मात्र दोन्ही पोलिसांनी रिक्षा चालकाला भररस्त्यात मारहाण केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून चौकशीचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे इंदोरमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असून पोलिसांनी कडक पवित्रा घेतला आहे.

First published:

Tags: Madhya pradesh