Home /News /crime /

संपत्तीसाठी सुनेने सासूच्या हत्येचा रचला कट; सकाळी घराबाहेर पडताच दगडाने ठेचून केली हत्या

संपत्तीसाठी सुनेने सासूच्या हत्येचा रचला कट; सकाळी घराबाहेर पडताच दगडाने ठेचून केली हत्या

सुनेनेचं यासंदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली होती, अखेर पोलिसांनी तपासादरम्यान या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे

वाशिम, 10 मार्च : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील प्रमिला देवळे या 60 वर्षीय वृद्धेची हत्या झाल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाच्या मदतीने केलेल्या तपासात धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणात महिलेची सून मुख्य सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मालेगाव पोलिसांनी सून रेखा देवळे आणि तिचा साथीदार डिगांबर देवळे या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी यासंदर्भात माहिती दिली. (daughter in law killed his mother in law out of lust for wealth) मालेगांव शहराजवळून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नागपूर - मुंबई या महामार्गावरील ग्राम नागरतास येथील प्रमिलाबाई केशव देवळे या महिलेचा खून झाल्याची माहिती तिची सून रेखा विजय देवळे हिने मंगळवार 9 मार्च रोजी सकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान मालेगांव पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलिसांनी  आपल्या लवाजम्यासह घटनास्थळ गाठून चाचपणी केली असता सदर वृद्ध महिलेच्या गळ्याला दोरी आवळून आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचं दिसून आले. आरोपी अज्ञात असल्याने मालेगाव पोलिसांनी तपासाला गती देत श्वानपथकासह फॉरेनसीक लॅबचे पथक नागरतास येथे पाचारण केले. श्वान पथकाच्या दिशादर्शक हालचालीवरून मृतक प्रमिला केशव देवळे यांची सून रेखा विजय देवळे हिच्यावरच संशय आला. त्यावरून मालेगांव पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता रेखा विजय देवळे हिनेच आपली सासू प्रमिलाबाईचा काटा काढला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे. हे ही वाचा-पोलीस कर्मचाऱ्याचा सासुरवाडीत अंधाधुंद गोळीबार, पत्नी आणि सासू-सासऱ्यांची हत्या प्रमिलाबाई केशव देवळे या महिलेच्या नावाने कौटुंबिक शेत जमीन होती. सदर जमिनीमध्ये रेखा विजय देवळे ही त्यांची सून वहिवाटदार होती. काही महिन्यांपूर्वी विजय केशव देवळे याचा नागरतास येथेच खून झाला होता. त्यानंतर सदर जमीन स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी रेखा विजय देवळे या महिलेचे तिची सासू प्रमिलाबाई केशव देवळे यांच्याशी नेहमी भांडण होत असत. त्यामुळे सासू प्रमिलाबाईंचा काटा काढून वारसाहक्काने जमीन स्वतःच्या नावाने करून घेण्यासाठी सून रेखा विजय देवळे हिने तिची सासू प्रमिलाबाईंचा साथीदाराच्या मदतीने मंगळवार 9 मार्च रोजी गावालगतच्या परिसरात प्रातविधीसाठी गेली असता दोरीने गळा आवळून आणि दगडाने ठेचून हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. घटनेनंतर अवघ्या बारा तासाच्या आत मालेगांव पोलिसांनी मृत महिलेची सून आरोपी रेखा विजय देवळे व तिच्या संपर्कात असलेल्या दिगंबर अवधूत देवळे या दोघांना भादंविच्या कलम 302 अन्वये काल रात्री उशीरा अटक केली आहे. आरोपी रेखा विजय देवळे व डिगांबर अवधूत देवळे या दोघांना पोलीस कोठडी करिता न्यायालयात हजर करण्यात आले असून 13 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Crime news, Murder, Washim

पुढील बातम्या