पाटना, 24 एप्रिल : बिहारमधील (Bihar) रोहतास (Rohtas) जिल्ह्यात खळबळजनक वृत्त समोर आलं आहे. येथील विक्रमगंज पोलीस ठाण्यातील बरना गावात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली. महिलेने पती महर्षी देव सिंहच्या गळ्याचा चावा घेतला. या घटनेनंतर आरोपी महिला आपला भाऊ आणि माहेरातील अन्य सदस्यांसह फरार झाले आहेत. दुसरीकडे पोलिसांनी 35 वर्षीय मृतक महर्षी सिंहचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहे. सतत होत होती भांडणं… बरना गावात राहणारे महर्षी सिंह यांचं लग्न दोन वर्षांपूर्वी लवली सिंहसोबत झालं होतं. दोघांना 10 महिन्यांची एक मुलगीदेखील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारीही दोघांमध्ये वाद होऊन मारामारी झाली. यामुळे संतापलेल्या लवलीने पतीच्या गळ्याचा चावा घेतला. यामुळे पतीच्या मानेची नस कापली गेली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. हे ही वाचा- 23 लाख रूपये देऊन खरेदी केला घोडा; घरी आणताच सत्य जाणून हादरला व्यक्ती ही बाब कुटुंबाला कळताच सर्वांना जबर धक्का बसला. मृत व्यक्तीची आई सतत रडत आहे. ती या सर्वांमागे सून जबाबदार असल्याचं सांगते. या प्रकरणा पोलिसांनी सांगितलं की ते घटनास्थळी जाऊ तपास करीत आहे. महर्षी देव याची पत्नी लवली सिंहने पतीच्या गळ्याभोवती चावा घेतला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितलं की, त्याच्या गळ्याभोवती दाताचे निशाण आहे. सध्या त्याची पत्नी फरार असून पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.