Home /News /nashik /

नाशकातील घनदाट जंगलात 10 वर्षीय मुलीसोबत सुरू होता भयंकर प्रकार; ऐनवेळी गुराखी आला अन्...

नाशकातील घनदाट जंगलात 10 वर्षीय मुलीसोबत सुरू होता भयंकर प्रकार; ऐनवेळी गुराखी आला अन्...

Crime in Nashik: दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडी याठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील घनदाट जंगलात एका 10 वर्षीय मुलीला फासावर लटकवून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    दिंडोरी, 08 जानेवारी: नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यातील देहरेवाडी याठिकाणी माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका घनदाट जंगलात (Forest at Deharewadi) एक अज्ञात व्यक्ती 10 वर्षीय मुलीला फासावर लटकवून मारण्याचा प्रयत्न (Attempt to murder in forest) करत होता. दरम्यान याठिकाणी आलेल्या एका गुराख्यामुळे संबंधित मुलीचे प्राण वाचले आहेत. गुराख्याला पाहून अज्ञात आरोपीनं जंगलाच्या दिशेनं धाव घेतली आहे. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद (FIR lodged) दाखल केली असून अज्ञात आरोपीचा शोध घेतला जात आहे. तर पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून ती अद्याप बेशुद्धावस्थेतच आहे. पण तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. पीडित मुलीची ओळख पटवण्याचं काम दिंडोरी पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुराखी नारायण गांगुर्डे शुक्रवारी दुपारी आपली जनावरं घेऊन देहरेवाडी येथील एका जंगलात गेले होते. जनावरं चारीत असताना, घनदाट झाडीतून त्यांना कसलातरी झटापट होत असल्याचा आवाज आला. हेही वाचा-पतीवरील रागाचा 2 चिमुकल्यांशी घेतला बदला; पुण्यात जन्मदात्या आईचं राक्षसी कृत्य जंगली जनावरं असावीत, असा अंदाज आल्याने ते आवाजाच्या दिशेने गेले आणि पाहणी केली. यावेळी एक अज्ञात व्यक्ती एका 10 वर्षांच्या मुलीला फासावर लटकवत असल्याचं दिसून आलं. संबंधित प्रकार पाहताच गुराखी गांगुर्डे यांनी तातडीने अज्ञात आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा घनदाट झाडीचा फायदा घेऊन आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर गांगुर्डे यांनी घडलेला सर्व प्रकार रवळगावचे पोलीस पाटील साहेबराव साळवे यांना कळवला. हेही वाचा-रिक्षाचं भाडं नाही म्हणून पुण्यात 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, माणुसकी मेली त्यांनी तातडीने याची माहिती दिंडोरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अल्पवयीन मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. यावेळी पीडित मुलगी बेशुद्धावस्थेत होती. जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. पीडित मुलगी कोण आणि तिच्यासोबत नेमकं काय घडलं याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पीडित मुलीची ओळख पटवण्याचं काम पोलीस करत आहेत. पीडित मुलीच्या अंगात पिवळ्या गर्द रंगाची फ्रॉक, पायात काळे बूट आणि नाकात तांब्याच्या धातूची मूरणी असल्याचं वर्णन पोलिसांकडून देण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास दिंडोरी पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Nashik

    पुढील बातम्या