संतोष कुमार गुप्ता, प्रतिनिधी छपरा, 27 मार्च : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येकाच्या मोबाईल असल्याचे सोशल मीडियाचा वापर करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील सारण जिल्ह्यातील मशरक पोलीस स्टेशन परिसरातून एक विचित्र घटना समोर आले आहे. मशरक पोलीस स्टेशन हद्दीतील सोनौली गावात राहणाऱ्या एका तरुणाने बनियापूर पोलीस स्टेशन हद्दीतील भाकुरा भिटाठी गावातील एका तरुणीशी फेसबुकवर मैत्री केली होती. फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून दोघांमध्ये मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. यानंतर घरच्यांच्या इच्छेविरुद्ध तरुणी तरुणासोबत पळून घेली. यानंतर दोघांनी आधी छपरा येथे कोर्ट मॅरेज केले. मग मंदिरात लग्न झाले. यानंतर दोघे पती-पत्नी बनल्यावर म्हणून दिल्लीला गेले. मात्र, चार महिन्यांनंतर प्रियकर आपल्या पत्नीला म्हणजे त्याच्या प्रेयसीला सोडून बिहारला परत पळून गेला. त्याचवेळी प्रेयसीने त्याला फोन केला तर त्याने फोन बंद येत होता. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, पतीशी बोलणे न झाल्याने कंटाळून ती दिल्लीहून सोनौली गावात पोहोचली. तिथे पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी तिला शिवीगाळ केली. दुसरीकडे तिने शिवीगाळ करण्यास विरोध केला असता सर्वांनी असभ्य वर्तन करत तिला पळवून लावले. यानंतर पतीसह फसवणूक आणि संपूर्ण कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी तरुणीने मशरक पोलीस ठाण्यात तक्रार केली. 5 वर्षांची मुलगी ज्या झाडाखाली खेळत होती, त्याच झाडाला बापाने घेतला गळफास, हादरवणारी घटना मिळालेल्या माहितीनुसार, अंकित कुमारची प्रीती कुमारीसोबत फेसबुकवर मैत्री झाली होती. दोघांनी एकमेकांचा नंबर घेतला. त्यानंतर दोघांमध्ये व्हॉट्सअॅपवर संभाषण सुरूच होते. दरम्यान, या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 27 डिसेंबर 2022 रोजी कोर्ट मॅरेजनंतर काही दिवसांनी मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न झाले होते. यानंतर दोघेही दिल्लीला गेले आणि आनंदात राहत होते. मात्र, काही कामामुळे अंकितने तिला न सांगता गावाकडे पळ काढला. तसेच गावात आल्यानंतर त्याने आपल्या पत्नीचा मोबाईल क्रमांक रिजेक्ट लिस्टमध्ये टाकला. त्याची वाट पाहून मी दिल्लीहून गावी पोहोचले तेव्हा माझ्या पतीने आणि घरच्यांनी मला घरात येऊ दिले नाही, असेही या तरुणीने सांगितले. लग्नाच्या चार महिन्यांनंतर प्रेमात फसवणूक झालेल्या प्रीतीने मशरक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी मशरक पोलीस स्टेशनचे प्रभारी राकेश कुमार यांनी सांगितले की, तरुणीने घटना सांगून पतीवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना अर्ज दिला. या अर्जाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.