मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

भयंकर! पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय, एक दिवस केला खेळ ‘खलास’

भयंकर! पत्नीच्या चारित्र्यावर होता संशय, एक दिवस केला खेळ ‘खलास’

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिघांवर (Husband kills wife by firing bullet on her) गोळीबार करत हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिघांवर (Husband kills wife by firing bullet on her) गोळीबार करत हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिघांवर (Husband kills wife by firing bullet on her) गोळीबार करत हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • Published by:  desk news
फरिदाबाद, 22 ऑक्टोबर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिघांवर (Husband kills wife by firing bullet on her) गोळीबार करत हत्या करणाऱ्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Doubt on character) घेणाऱ्या पतीने तिच्या माहेरी जाऊन हत्या केल्याच्या घटनेमुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे. आपल्या पत्नीचे इतर कुणासोबत तरी प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय पतीला होता. त्यातूनच एक संसार केवळ मोडलाच नाही, तर अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. संशयावरून मोडला संसार हरियाणाच्या फरिदाबादमध्ये राहणाऱ्या नीरजचा काज-बटन लावण्याचा व्यवसाय आहे. पत्नी आएशासोबत त्याचं 14 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्याला एक 12 वर्षांचा मुलगादेखील आहे. गेल्या काही दिवसांपासून नीरजला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. आपल्या पत्नीचे परपुरुषासोबत संबंध असल्याच्या संशयाने त्याला पछाडले होते. यावरून दोघांची भांडणं होत होती. भांडण विकोपाला गेल्याने पत्नी आएशा घर सोडून माहेरी राहायला गेली होती. मेहुण्यासोबतही होते वाद नीरजचा मेहुणा गगन हादेखील व्यावसायिक होता. नीरज आणि गगनमध्ये पैशांची देवाणघेवाणदेखील होत होती. नुकताच 10 लाख रुपयांचा व्यवहार त्यांच्यात झाला होता. त्या मुद्द्यावरूनही त्यांच्यात वाद होत होते. या सगळ्यामुळे वैतागलेल्या नीरजनं अखेर सर्वांचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. असा केला खून एक दिवस नीरज पत्नीच्या माहेरी राहायला गेला. त्याच्यासोबत त्याचा मित्रदेखील होता. रात्री जेवण करून सगळे झोपले असताना पहाटे 2 वाजून 45 मिनिटांच्या सुमाराला नीरजनं बंदुकीने पत्नीवर गोळ्या झाडल्या. त्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला. गोळ्यांचे आवाज ऐकून खोलीत धावत आलेल्या गगनवरही नीरजने गोळीबार केला. गगनच्या कंबरेला गोळ्या लागल्यामुळे तो जखमी झाला. हे वाचा- 9 महिन्यांचा 100 कोटींपर्यंतचा प्रवास: भगीरथ प्रयत्न आणि लोकसहभागातून केलं अशक्य पोलीस करतायत तपास जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या गगनने नीरजविरुद्ध गुन्हा नोंदवला. पोलिसांनी नीरजला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
First published:

Tags: Crime, Haryana, Murder, Wife and husband

पुढील बातम्या