लखनऊ 23 डिसेंबर : आग्र्यातील सिंकदरा भागातील शेखर एन्क्लेव्ह कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर आपल्या लहान मुलाला घेऊन तो स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. उदयसिंह असं आरोपी पतीचं नाव आहे. त्यानं 31 वर्षांच्या ज्योतीची हत्या केली. मंगळवारी (20 डिसेंबर) ही घटना घडली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात खुनाचं कारण समोर आलं आहे. पतीचा खरा चेहरा समोर आला अन् रस्त्यावरच हाय व्होल्टेज ड्रामा झाला, पत्नीने धुलाई करत कॉलर पकडली अन्… सिक्युरिटी एजन्सी ऑपरेटर उदयसिंह याच्या दोन पत्नी आहेत. दोघींनी एकत्र राहावं, अशी त्याची इच्छा होती. यासाठी दुसरी पत्नी असलेली ज्योती तयार नव्हती. त्यामुळे त्यानं तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून गुरुवारी कारागृहात पाठवलं आहे. ‘दैनिक जागरण’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सिकंदरामधील अटूस येथील रहिवासी उदयसिंह याची चार वर्षांपूर्वी ज्योतीशी भेट झाली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तीन वर्षांपूर्वी त्यांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. मात्र, उदयचं त्यापूर्वीही एक लग्न झालं होतं. ही बाब त्यानं ज्योतीपासून लपवून ठेवली होती. कालांतरानं ज्योतीला याबाबत माहिती मिळाली. या कारणावरून उदय आणि ज्योती यांच्यात रोज भांडणं होत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. त्याला दोन्ही बायकांना एकत्र ठेवायचं होते. ज्योती यासाठी तयार नव्हती. त्यानं तिला दुसऱ्या शहरात राहण्यास सांगितले. यासोबतच त्यानं ज्योतीचा मोबाईल नंबरही बदलण्याचा प्रयत्न केला होता. दोघांचाही आपापल्या घरच्यांशी कोणताही संबंध किंवा संपर्क नसावा, अशी त्याची इच्छा होती. ज्योती आपला मोबाईल नंबर बदलण्यासदेखील तयार नव्हती. Honey Trap UP Police : प्रेमातून हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढायची नंतर लाखोंना फसवायची, कोण आहे ही बेगम? प्रभारी निरीक्षक आनंद कुमार शाही यांनी सांगितलं की, पती उदयने चौकशीदरम्यान माहिती दिली की, तो दोन पत्नींचा खर्च उचलण्यास सक्षम नव्हता. त्यामुळे त्याला दोन्ही बायकांना गावात एकत्र ठेवायचं होतं. मात्र, ज्योतीची इच्छा होती की, त्यानं पहिली पत्नी आणि मुलांशी संबंध ठेवू नयेत. मंगळवारी यावरून वाद विकोपाला गेला. त्यानं रागाच्या भरात ज्योतीचा गळा दाबून खून केला. पत्नीची हत्या केल्यानंतर त्यानं सिकंदरा पोलीस स्टेशन गाठलं. मृत ज्योतीचे वडील बाबूराम हे पोलीस हवालदार होते. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आणि ज्योतीची आई सोना देवी पोलीस हवालदार झाल्या आहेत. त्यांचा विरोध पत्करून ज्योतीनं उदयसिंहशी लग्न केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.