अमरोहा, 22 डिसेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. तसेच लिव्ह इन प्रकारातील संबंधामध्येही हत्येच्या घटना समोर येत आहेत. तसेच अनैतिक संबंधातून पार्टनरची हत्या केल्याची घटना उघडकीस येत आहेत. यातच आता लव्ह मॅरेज केलेल्या तरुणाने सहा महिन्यातच पत्नीला सोडून आपल्या मेहुणीसोबत पळ काढल्याचे घटनेने खळबळ उडाली आहे. सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केलेला तरुण पत्नीला सोडून मेहुणीसह पळून गेला. पतीच्या या निर्णयानंतर विवाहितेला धक्काच बसला. यानंतर तिने सासर तर सोडलेच. मात्र, यानंतर माहेरीही न जाता थेट मैत्रिणीच्या घरी आश्रय घेतला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी गुंतलेल्या कौटुंबिक पंचायतीमध्ये पत्नीला घटस्फोट देऊन मेहुणीसोबत लग्न करण्याचा निर्णय झाला. तर याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आलेली नाही. ही घटना उत्तरप्रदेशच्या अमरोहा येथील आहे. येथील रहिवासी असलेल्या तरुणाने सहा महिन्यांपूर्वी प्रेमसंबंधातून शेजारील वस्तीत राहणाऱ्या तरुणीशी लग्न केले होते. दोन्ही घरच्यांच्या संमतीने हे लग्न झाले होते. मात्र, असे सांगितले जात आहे की, तरुण जेव्हा त्याच्या सासरच्या घरी जाऊ लागला तेव्हा त्याच्या लहान मेहुणीच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये मग हे गुप्त प्रेम फुलले. याचदरम्यान, दोन दिवसांपूर्वी सासरी आलेल्या तरुण आपल्या मेहुणीसह शहरातून पळून गेला. हेही वाचा - ओळख, मैत्री, प्रेम, लिव्ह-इन, शरीरसंबंध अन् गर्भवती झाल्यावर मात्र…, अमरावतीच्या तरुणीसोबत काय घडलं? त्याचवेळी पतीसह बहिण फरार झाल्याची माहिती मिळाल्याने पत्नी संतापली. याच संतापातून पत्नीने सासरच्या व माहेरच्या लोकांपासून दुरावा करुन घेतला. तसेच आपल्या मैत्रिणीच्या घरी आसरा घेतला. दोन्ही कुटुंबात तणावाच्या वातावरण आहे. यामुळे पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर परस्पर संमतीने तरुणाचे लग्न त्याच्या मेहुणीशी लावण्याचे ठरले, पंचायतीमध्ये ठरले. प्रेमी युगुलाच्या सांगण्यावरून घरच्यांना हा निर्णय घ्यावा लागला. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे विवाहितेची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







