सीतापूर, 22 फेब्रुवारी : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडल्या आहेत. अनैतिक संबधातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या भावाने आणि वडिलांनी प्रियकराची गोळ्या झाडून हत्या केली. तसेच यानंतर मृतदेह रस्त्याच्या मधोमध फेकून दिला. काय आहे संपूर्ण प्रकरण - उत्तर प्रदेशातील सीतापूरमधून हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे प्रेयसीच्या भावाने आणि वडिलांनी प्रियकराची गोळ्या झाडून हत्या करून मृतदेह रस्त्याच्या मधोमध फेकून दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणाचा तपास सुरू केल्यावर पोलिसांनी प्रेयसीच्या नातेवाईकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय तौसिफचे त्याच गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास तौसिफ हा त्याच्या प्रेयसीला तिच्या घरी भेटण्यासाठी गेला होता. हा प्रकार प्रेयसीच्या कुटुंबीयांना कळताच संतप्त नातेवाईकांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. तसेच मृतदेह घरापासून 100 मीटर अंतरावर फेकून दिला. हेही वाचा - भयानक, 20 रुपयांची नोट दाखवून जवळ बोलावलं, अंध आईसोबत भीक मागणाऱ्या चिमुरडीवर अत्याचार, बीड हादरलं याप्रकरणी तौसिफच्या पत्नीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तरन्न्नुमने पोलिसांना सांगितले की, रात्री अकराच्या सुमारास पतीच्या प्रेयसीचा फोन आल्यानंतर तौसीफ तिच्या घरी गेला होता. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मुलीने चुलत भावाला फोन करून तौसिफच्या हत्येची माहिती दिली आणि मृतदेह घरापासून 100 मीटर अंतरावर फेकून देणार असल्याचे सांगितले. मृत तौसिफचे आधीच लग्न झाले होते आणि त्याला 2 मुले देखील आहेत. तरन्नुमने मुलीचे वडील, तीन भाऊ आणि अन्य एकाच्या विरोधात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलिसांचे म्हणणे आहे की, प्रेमप्रकरणातून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. चौघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.