जयपूर 30 मे : विवाहित महिलेसोबतचं प्रेमप्रकरण एका व्यक्तीला खूप महागात पडलं. त्याची किंमत त्याला जीव गमावून चुकवावी लागली. कारण महिलेचा पती पत्नी आणि या व्यक्तीच्या नात्याला सतत विरोध करत होता. मात्र तरीही त्यांनी ऐकलं नाही. अखेर पतीने पत्नीच्या प्रियकराला आपल्या घरी आला असतानाच पकडलं. यानंतर महिलेच्या पतीने त्याला आधी जेवण दिलं. इतकंच नाही तर त्याला आपल्याच घरात झोपवलं आणि सकाळी तो झोपेत असतानाच त्याच्या पोटात चाकूने भोसकलं. या हल्ल्यात गंभीर झालेल्या व्यक्तीचा संजय गांधी रुग्णालयात मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मुंडका पोलीस स्टेशन हद्दीतील एका कॉलनीत राहणारी महिला पूजा हिची प्रदीप या व्यक्तीशी मैत्री होती. पूजा आणि प्रदीप दोघेही एकाच कारखान्यात काम करायचे. पुढे मैत्री अधिकच घट्ट होत गेली, त्याच दरम्यान पूजाच्या नवऱ्याला समजलं की त्यांची मैत्री झाली आहे, कारण प्रदीप कधी कधी त्याच्या घरी यायचा. ही गोष्ट त्याला आवडली नाही. त्यानी दोघांना अनेकदा समजावलं पण दोघेही ते मान्य करत नव्हते. Shocking News: लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरीची ओढणी घेऊन गेला अन्.., नवरदेवाचं धक्कादायक पाऊल गुरुवारी पूजाचा पती चरणसिंग याने आपण गावी जात असल्याचं निमित्त केलं, मात्र तो रात्री फिरत फिरत परत आला आणि प्रदीप त्याच्या घरीच असल्याचं पाहून भडकला. हे पाहून प्रदीप तिथून पळू लागला, मात्र पूजाच्या पतीने त्याला पकडलं. त्याला प्रेमाने समजावलं आणि रात्री त्याला जेवण दिलं. यानंतर आपल्याच घरी झोपवलं. पहाटे सगळे झोपलेले असताना चरणसिंगने चाकू काढून प्रदीपच्या पोटात भोकसला. त्याच्यावर चाकूने हल्ला होताच प्रदीपने ओरडा केला, पूजाही उठली आणि दोघांनी मिळून आरोपीला विरोध केला. पूजाने गंभीर जखमी प्रदीपला तातडीने मंगोलपुरी येथील संजय गांधी रुग्णालयात नेले. रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, उपचारादरम्यान प्रदीपचा मृत्यू झाला. कारण जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चरणसिंगला अटक केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







