मुरादाबाद, 6 फेब्रुवारी : सध्या देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हत्या, आत्महत्येच्याही घटना समोर येत आहेत. तसेच विवाहबाह्य संबंधाच्याही अनेक घटना घडत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पती परदेशात नोकरीसाठी गेला असताना महिलेच्या एका तरुणासोबत सूत जुळले. दोन्ही आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्यानंतर घटना उघडकीस आली आहे. यावेळी प्रियकराला प्रेयसीसोबत प्रेम करणे चांगलेच अंगाशी आले आहे. प्रियकरा हा प्रेयसीला भेटण्यासाठी महिलेच्या घरी गेला होता. मात्र, यावेळी प्रेयसी महिला आणि तिचा प्रियकर दोन्ही आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशच्या मुरादाबादच्या सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन हद्दीतील आगवानपूर नगर पंचायत परिसरातील ही घटना आहे. महिलेचा पती सुमारे सहा महिन्यांपासून नोकरीसाठी सौदी अरेबियाला गेला होता. त्याची पत्नी आणि चार मुले आगवानपूर येथे राहतात. तर त्याच्या मोठ्या भावाचे कुटुंबही शेजारीच राहते. काल रात्री महिला आपल्या मुलांसह घरात झोपली होती. यानंतर पहाटे साडेपाचच्या सुमारास वस्तीत राहणाऱ्या एका तरुणाने भिंतीवरून उडी मारून महिलेच्या घरात प्रवेश केला. हेही वाचा - बायको आणि मुलांच्या हत्येनंतर नवऱ्याने घरात लावली आग? एकाच परिवारातील चौघांच्या मृत्यूने खळबळ या तरुणाला घरात डोकावताना शेजाऱ्यांनी पाहिले होते. त्यांनी महिलेच्या भाच्याला फोन करून माहिती दिली. त्यामुळे महिलेचे नातेवाईक सक्रिय झाले. काही वेळाने सर्व लोक महिलेच्या घरात घुसले असता महिला प्रेयसी आणि तिचा तरुण प्रियकर हे दोन्ही आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. यानंतर त्यांनी त्या तरुणाला खोलीत ओलीस ठेवले आणि प्रियकर तरुणाला बेदम मारहाण केली. तरुणाच्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तरूणाला ओलीस ठेवून दीड तासाहून अधिक काळ मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर माफी मागवून तरुणाची सुटका करण्यात आली. तर दुसरीकडे महिलेचा जेठ आणि दीर यांनी या महिलेच्या आई-वडिलांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. दरम्यान या महिलेच्या पालकांनी महिलेला फटकारले आणि भविष्यात असे कृत्य करू नये, असा सल्ला देऊन परतले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.